भारत देशासह परदेशात केशर आंब्यांच्या परिचय असणारे आंबा बागायतदार स्व. बलभीम वाघोबा सरगर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन.
खुडूस ( बारामती झटका )
खुडूस गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील भारत देशासह जपान, युरोप आणि रशिया या देशात केशर आंब्याच्या परिचय असणारे आंबा बागायतदार स्व. बलभीम वाघोबा सरगर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त बुधवार दि. 06/04/2022 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये ह.भ.प. गायनाचार्य दत्तात्रय गलांडे महाराज, लासुर्णे यांचे सुश्राव्य कीर्तन खुडूस येथील सरगर वस्ती चौकी नंबर 3 येथे होणार आहे. तरी सर्व नातेवाईक, मित्र परिवार यांनी उपस्थित रहावे असे, श्रीमती जिजाबाई बलभीम सरगर, सौ. साधना व श्री. मकरंद बलभीम सरगर, सौ. पूजा व श्री दत्तात्रेय बलभीम सरगर, सौ. वंदना व श्री. केशव बलभीम सरगर, सौ. दिपाली नवनाथ गावडे यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
बलभीम सरगर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, कष्टातून आपली शेती फुलविलेली आहे. आपल्या मुलांना शिक्षित करून चांगले संस्कार केलेले आहेत. सरगर नर्सरीच्या माध्यमातून महाराष्ट्रात व राज्याबाहेर केशर आंबा रोपे देऊन अनेक लोकांना शेतीची आवड निर्माण केलेली आहे. त्यांनी मुलांच्या सहकार्यावर स्वकर्तुत्वाने शेती विकत घेऊन आंबा बाग फुलविलेली आहे. खुडूसच्या केशर आंब्याची भारत देशासह परदेशात मागणी असते. अनेक महोत्सवांमध्ये केशर आंब्याला मागणी असते. बलभीम सरगर यांनी कष्टातून शेती फुलविलेली असल्याने त्यांच्या परिवारांना महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागातील विविध पुरस्कार मिळालेले आहेत.

बलभीम सरगर यांच्या उपस्थितीमध्ये कृषी विभागाचा सर्वात श्रेष्ठ समजला जाणारा कृषिभूषण पुरस्कार मिळालेला होता. त्यांनी दरिद्री संसाराचा स्वर्ग बनवलेला होता. त्यांना श्रीमती जिजाबाई यांची कायम साथ मिळालेली होती. साधी राहणी, स्वच्छ विचारसरणी होती. पांढरीशुभ्र टोपी, धोतर, तीन गुंड्याचा पांढरा शर्ट असा त्यांचा पेहराव होता.
गेल्यावर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले होते. सरगर परिवार यांचा आधारवड कोसळला होता. बघता बघता एक वर्ष पूर्ण होत आलेले आहे. प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. सर्वांना हस्ते परहस्ते निमंत्रण आमंत्रण दिलेले आहे. नजरचुकीने न मिळाल्यास हेच निमंत्रण समजून आमच्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणास उपस्थित रहावे, असे आवाहन मकरंद सरगर, दत्तात्रय सरगर, डॉ. केशव सरगर आणि सरगर परिवार यांच्यावतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng