ह.भ.प. गायनाचार्य श्री. विकास महाराज देवडे कर्जत यांचे सुश्राव्य कीर्तन होणार

गिरवी गावचे माजी सरपंच व तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष स्व. बापू गोफणे उर्फ मामा यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन

गिरवी ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील
गिरवी येथील माजी सरपंच महात्मा गांधी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष कै. बापू आण्णा गोफणे (मामा) यांचे तृतीय पुण्यस्मरण सोमवार दि. 10/10/2022 रोजी आहे. पुण्यस्मरणानिमित्त ह.भ.प. गायनाचार्य श्री. विकास महाराज देवडे कर्जतकर यांचे सुश्राव्य असे किर्तन सकाळी ते 10 ते 12 या वेळेत होणार आहे. त्यानंतर बारा वाजून पाच मिनिटांनी पुष्पवृष्टी होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे‌. सर्व मित्रमंडळी, पै-पाहुणे यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीमती कमल बापू गोफणे, प्रा.श्री. तुकाराम बापू गोफणे (सर), श्री. जयराम बापू गोफणे (सर), श्री. उत्तम बापू गोफणे आणि समस्त गोफणे परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

स्वर्गीय बापू आण्णा गोफणे यांना गिरवी परिसरामध्ये मामा या टोपण नावाने ओळखले जात होते. मामांनी गिरवी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाबरोबरच गिरवी गावच्या तंटामुक्त समितीचे पंधरा वर्षे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळलेला होता. सर्व समावेशक राजकारण व समाजकारण करून समाजामध्ये आदराचे स्थान निर्माण केलेले होते.

काही गडबडीमुळे आपणांस आमंत्रण अथवा निमंत्रण न मिळाल्यास हेच निमंत्रण समजून सदर कार्यक्रमास पंचक्रोशीतील सर्व नातेवाईक, पै-पाहुणे, मित्रमंडळी यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त गोफणे परिवार यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकुसमोड येथील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग दाखला व ओळखपत्र धैर्यशीलजी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले प्राप्त
Next articleएक रकमी एफआरपी घेतल्याशिवाय धुराडे पेटु देणार नाही, स्वाभिमानीचा एल्गार !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here