ह.भ.प. गीतांजलीताई अभंग यांचे माता पिता कृतज्ञ दिनानिमित्त सुश्राव्य किर्तन.

माळशिरस ( बारामती झटका )

विझोरी ता. माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार स्वर्गीय ईश्वरा नारायण राचकर व स्वर्गीय फुलाबाई ईश्वरा राचकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ह.भ.प. गीतांजलीताई अभंग यांचे सुश्राव्य किर्तन सोमवार दि. 28/03/2022 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये होणार आहे. माता पिता कृतज्ञता दिनानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन श्री पांडुरंग, श्री. रामचंद्र, श्री. हरिभाऊ ,श्री. नानासो, श्री. भीमराव, श्री. शिवाजी, श्री. तानाजी राचकर व मुक्ताबाई बाळासो काळे पाटील, जयश्री भानुदास डोमाळे यांच्यावतीने विनंती करण्यात येत आहे.

माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य श्री. पांडुरंग ईश्वरा राचकर यांचे पिताश्री ईश्वरा व मातोश्री फुलाबाई यांचे दुःखद निधन झालेले आहे. माता पिता कृतज्ञता दिन उभय पती-पत्नींचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी सदर कार्यक्रमास नातेवाईक, मित्रपरिवार, विझोरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन राचकर परिवार यांच्यावतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसोलापूर जिल्हे का किसान मोर्चा का बढिया अच्छा काम है – केंद्रीय दूरसंचार मंत्री देवुसिंग चौहान
Next articleलोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या नावाने बार्टीच्या धरतीवर स्वतंत्र संस्था सुरु करावी – आमदार रामभाऊ सातपुते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here