स्वर्गीय सोनाबाई शिवाजीराव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस येथील स्वर्गीय सोनाबाई शिवाजीराव पाटील उर्फ जिजी यांच्या गुरुवार दि. 17/3/2022 रोजी प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ह.भ.प. गुरव महाराज पंढरपूरकर यांचे सुश्राव्य किर्तन सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये कोंडबावी रोड आकाश पाटील नगर पाटील वस्ती येथे होणार आहे. दु. 12 वाजता प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे असे नामदेव, निवृत्ती, पांडुरंग, मारुती, तानाजी पाटील व श्रीमती अंजना कचरे यांच्यावतीने करण्यात येत आहे.
माळशिरस शहरात प्रगतशील बागायतदार शिवाजीराव पाटील व सोनाबाई पाटील शेतकरी कुटुंब होते. त्यांना नामदेव, निवृत्ती, पांडुरंग, मारुती, तानाजी आणि अंजना अशी सहा अपत्य आहेत. त्यांना एकूण सात अपत्ये आहेत, पण त्यापैकी एका मुलाचा मृत्यू झालेला आहे. शेतकरी व सर्व सामान्य असणारे पाटील कुटुंबीय यांनी आपली मुले व नातवंडे सुसंस्कृत केलेली आहेत. पांडुरंग पाटील वकील आहेत. तर मारुतीराव पाटील डॉक्टर आहेत. माळशिरस शहराच्या जडणघडणीत शिवाजीराव पाटील यांचा मोलाचा वाटा होता. गेल्या दहा वर्षांमध्ये शिवाजीराव पाटील यांचे दुःखद निधन झालेले होते. त्यांच्या पश्चात राजकारणामध्येही डॉक्टर मारूतीतराव पाटील यांनी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, माळशिरस नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अशा पदावर काम करून घराण्याचा वारसा जपलेला आहे. जिजी यांचे नातू आकाश पाटील हे सुद्धा वकील झालेले आहेत. नाथ अनेशा पाटील यांनी राष्ट्रवादी युवती माळशिरस तालुका अध्यक्ष पदावर काम केले आहे. स्वर्गीय शिवाजीराव पाटील यांच्या पश्चात सोनाबाई यांनी आपल्या परिवारावर मायेचे पांघरून घातलेले होते. गेल्यावर्षी जिजी यांचे दुःखद निधन झाले.

‘जिजीच असण आमच्यासाठी सर्वस्व होतं. ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होतं, आता सर्व काही असण्याची जाणीव आहे, पण तुम्ही आमच्यात नाही हीच मोठी उणीव आहे’. जिजीच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन पाटील परिवार यांचेकडून करण्यात येत आहे. नजरचुकीने आपणास निमंत्रण हस्ते परहस्ते देण्याचे घाईगडबडीत राहिले असेल तर हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे माळशिरस नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर मारुतीराव पाटील यांनी नम्र आवाहन केलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng