स्वर्गीय नारायण झंजे यांच्या परिवाराची एकसष्टी करण्याची संकल्पना, मात्र दुर्दैवाने पुण्यस्मरण करण्याची वेळ.
मेडद (बारामती झटका )
मेडद ता. माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार स्वर्गीय नारायण दशरथ झंजे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार दि. 31/03/2022 रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर फुले महाराज यांचे सुश्राव्य किर्तन मेडद ता. माळशिरस येथील निवासस्थानी होणार आहे. श्रीमती किसाबाई नारायण झंजे, श्री. गोविंद दशरथ झंजे, श्री. बाळासो दशरथ झंजे, सौ. रतन शंकर सरगर, श्री. दत्ता नारायण झंजे, सौ. अलका दादा सरगर त्यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येते की, प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी नातेवाईक, मित्र परिवार यांनी वेळेवर उपस्थित रहावे.
मेडद येथील शेषाबाई व दशरथ झंजे यांना नारायण, गोविंद, बाळासो अशी तीन मुले आणि रतन एक मुलगी असा परिवार होता. घरची परिस्थिती गरिबीची व हलाखीची होती. अशा परिस्थितीत नारायण यांना शिक्षण घेता आले नाही. सर्वात मोठे असल्याने कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आलेली होती. वडील दशरथ यांचे निधन झाल्यानंतर आई शेषाबाई यांच्यावर पितृत्व आणि मातृत्वाची जबाबदारी आलेली होती. नारायण यांनी आपले बंधू गोविंद यांना इलेक्ट्रिक डिप्लोमा केला. त्यांना मेडद गावचे उपसरपंच पदावर जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली होती. पुतण्या पांडुरंग यांना मेकॅनिकल इंजिनिअर केले तर पुतणी तृप्ती कॉम्प्युटर इंजिनियर आहे. त्यांचा मुलगा दत्ताभाऊ यांनी पुण्यामध्ये स्वतःचा व्यवसाय करून ते यशस्वी उद्योगपती बनलेले आहेत. दिवसेंदिवस परिवाराची आर्थिक परिस्थिती सुधारत चालली होती.

नारायण यांच्या घरामध्ये मातोश्री शेषाबाई, पत्नी किसाबाई, बंधू गोविंद आणि बाळासाहेब, बहिण रतन, मुलगा दत्ताभाऊ, मुलगी अलका आणि तीन पुतणे, दोन पुतण्या, सुना, नातवंडे असा परिवार सुख समाधानाने आणि आनंदाने राहत होता. नारायण यांचा जन्म दि. 15/11/1960 सालचा आहे. 2021 साली एकसष्टी साजरी करण्याचा संकल्प झंजे परिवार यांनी केलेला होता. मात्र काळाने 10/04/2021 रोजी घाला घातला आणि नारायण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रतिकूल परिस्थितीत आई-वडिलांच्या संस्कारातून दरिद्री संसाराचा स्वर्ग बनवणाऱ्या नारायण झंजे यांच्या परिवारावर एकसष्टीची तयारी सुरू असताना पुण्यस्मरण करण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे. ईश्वरी सत्तेपुढे इलाज नसतो या न्यायाने दुःखातून सावरले.
बघता बघता एक वर्ष होत आले आहे. त्यानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. सदर कार्यक्रमास आपणांस आमंत्रण निमंत्रण न मिळाल्यास हेच आमंत्रण समजुन येण्याचे अगत्य करावे, असे नम्र आवाहन उद्योगपती दत्ताभाऊ झंजे आणि झंजे परिवार यांच्यावतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng