राष्ट्रवादीचे आमदार स्व. हनुमंतराव डोळस यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन
माळशिरस ( बारामती झटका )
दसुर ता. माळशिरस येथील थोर सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार स्वर्गीय हनुमंतराव डोळस यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त मंगळवार दि. 26/04/2022 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये प्रतिमेची विधीवत पूजा होवून 10 ते 12 या वेळेमध्ये ह.भ.प. धनंजय सुमंत गुरव महाराज धोंडेवाडी, ता. पंढरपूर, यांचे सुश्राव्य किर्तन होऊन पुष्पवृष्टी नंतर आरती व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीमती कांचन हनुमंतराव डोळस, चि. संकल्प हनुमंत डोळस आणि कु. सिद्धी हनुमंतराव डोळस यांच्यावतीने करण्यात येत आहे.
माळशिरस विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व हनुमंतराव डोळस यांनी केलेले होते. त्यांनी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ राज्यमंत्री पदाचा दर्जा असणाऱ्या महामंडळावर काम केलेले होते. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेल्या माळशिरस विधानसभा मतदार संघावर प्रतिनिधित्व करण्याची संधी देशाचे नेते माजी कृषिमंत्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्वांच्या सहकार्याने संधी मिळालेली होती. आमदार हनुमंतराव डोळस यांनी मिळालेल्या संधीचे सोने केलेले आहे. तालुक्यामध्ये अनेक विकास कामे करून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केलेला होता. आमदार असतानाच त्यांचा जर्जर आजाराने मृत्यू झालेला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी यांनी सेवेचे व्रत अखंडपणे सुरू ठेवलेले आहे.
डोळस परिवारासाठी,
तुमचं असणं आमच्यासाठी सर्व काही होतं,
ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होतं,
आज सर्व काही असण्याची जाणीव आहे पण,
तुम्ही नसल्याची मोठी उणीव आहे.

या उक्तीप्रमाणे ईश्वरी सत्तेपुढे इलाज नाही, असे समजून स्वर्गीय हनुमंतराव डोळस यांचे तिसरे पुण्यस्मरण आयोजित केलेले आहे. सदर कार्यक्रमास मित्र परिवार, नातेवाईक यांना हस्ते परहस्ते आमंत्रण निमंत्रण दिलेले आहे. नजरचुकीने निमंत्रण न मिळाल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव व सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष संकल्पभैया डोळस यांनी नम्र आवाहन केलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
