पंचायत समिती सदस्य गौतमआबा माने मित्र मंडळाच्या वतीने ह. भ .प. रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांचे कीर्तन तर ह .भ. प. लक्ष्मण राजगुरू महाराज यांचे भारुड कार्यक्रम.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस पंचायत समितीचे विद्यमान सदस्य गौतमआबा माने मित्रपरिवार कण्हेर व समस्त ग्रामस्थ कण्हेर यांच्या वतीने भव्य किर्तन सोहळा आयोजित केलेला आहे.
गुरुवार 10/02/2022 रोजी सायंकाळी 07 ते 09 या वेळेत ह. भ. प. लक्ष्मण राजगुरू महाराज कण्हेर यांचे भारुड तर रात्री 09 ते 11 या वेळेमध्ये ह. भ प. रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज नागपूर यांचे सुश्राव्य किर्तन कण्हेर येथील हनुमान मंदिर येथे संपन्न होणार आहे .

ह .भ. प. रामायणाचार्य रामराव ढोक महाराज नागपूर यांच्या किर्तनाचा लाभ माळशिरस तालुक्यातील अध्यात्मिक नागरिक व हरी भक्तांना गौतमआबा माने मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ कण्हेर यांच्यामुळे लाभ होणार आहे ढोक महाराज यांचे भाषे वरती प्रभुत्व आहे अध्यात्माचा गाढा अभ्यास आहे अशा नामांकित कीर्तनकारांचा दुर्मिळ योगायोग होणार आहे कारण संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी 1987 साली कुरभावी येथील पाटील परिवार यांनी ह. भ. प. रामराव ढोक महाराज यांचे कीर्तन ठेवलेले होते त्यावेळेस कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय सदाशिवनगर येथे अकरावी इयत्ता शाळेत शिकत असताना किर्तन ऐकण्याचा योग आलेला होता तब्बल 35 वर्षानंतर ह भ प ढोक महाराज यांचे किर्तन श्रवण करण्याचा योग आलेला आहे. तरी असा दुर्मिळ योगायोग कण्हेर पंचक्रोशीतील नागरिकांना मिळालेला आहे तरी या सुवर्ण संधीचा कोरोनाचे नियम पाळून नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने यांच्या मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng