स्वर्गीय शिवाजीराव धोंडीबा लांडगे (भाऊसाहेब) यांचे तृतीय पुण्यस्मरण.
माळशिरस ( बारामती झटका )
स्वर्गीय शिवाजीराव धोंडीबा लांडगे उर्फ लांडगे भाऊसाहेब यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवार दि. 11/02/2022 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये ह.भ.प. एकनाथ महाराज हांडे पंढरपूरकर यांचे सुश्राव्य किर्तन जाधववाडी 52 फाटा ता. माळशिरस येथे त्यांच्या निवासस्थानी संपन्न होणार आहे. किर्तन रुपी सेवा संपल्यानंतर पुष्पवृष्टी होऊन महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन लांडगे परिवार यांच्यावतीने करण्यात येत आहे.

लांडगे भाऊसाहेब विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये सचिव पदावर कार्यरत होते. तीन वर्षापूर्वी त्यांचे अपघाती दुःखद निधन झालेले होते. लांडगे भाऊसाहेब यांचा सुसंस्कृत स्वभाव, शुद्ध आचारविचार, सहकार्य करण्याची भावना त्यामुळे शेतकरी बांधव व मित्र मंडळी यांच्यामध्ये लांडगे भाऊसाहेब यांनी वेगळे स्थान निर्माण केले होते. एखादे काम करावयाचे असे ठरले की ते काम पूर्ण झाल्याशिवाय चैन पडणार नाही. मनामध्ये ईर्षा होती, कोणाविषयी द्वेश नव्हता. भाऊसाहेब यांनी अनेक लोकांना सहकार्य केलेले आहे. भाऊसाहेब यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या परिवाराचे अतोनात नुकसान झालेले आहे. तसेच मित्रपरिवार यांचाही आधारवड गेलेला आहे. अशा सर्वगुणसंपन्न असणाऱ्या लांडगे भाऊसाहेब यांना तृतीय पुण्यस्मरणानिमित्त बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng