स्वर्गीय सुखदेव कोकणे यांचे जळभावी येथील निवास्थानी पुण्यस्मरण कार्यक्रम.

जळभावी (बारामती झटका)
जळभावी ता. माळशिरस येथील स्वर्गीय सुखदेव तात्याबा कोकणे यांचे शुक्रवार दि. 15/10/2021 रोजी प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज भगत, नातेपुते यांचे सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम सकाळी 10 ते 12 या वेळेत जळभावी येथील यांच्या निवास्थानी झाला आहे.
जळभावी येथे सुखदेव तात्याबा कोकणे सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील व्यक्ती होते. त्यांची परिस्थिती हलाखीची व गरिबीची होती. त्यांना पत्नी सुमल, मुलगा विकास, मुलगी वैशाली आणि पुष्पा असा परिवार आहे. परिस्थितीची जाणीव असल्यामुळे परिवारातील सर्वांचा शेतीमध्ये प्रपंचाचा रहाट गाडा सुरू आहे. सुखदेव यांचा शेतीचा व्यवसाय आहे. ते जळभावी येथे त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये काम करतात. मोठ्या मुलीचा विवाह जळभावी येथील बाळासाहेब राऊत यांच्याशी झालेला आहे. गुण्यागोविंदाने मुलांचा व मुलींचा संसार सुरू होता दिवसेंदिवस कष्टावर आर्थिक परिस्थिती सुधारत चाललेली होती. दिवस चांगले येऊ लागलेले होते. अशातच काळाने घाला घातला. एक वर्षापूर्वी कोकणे परिवार यांचा आधारवड कोसळला. सुखदेव कोकणे यांचे दुःखद निधन झाले. काळ थांबत नसतो, बघता बघता वर्ष झाले. त्यांचे प्रथम पुण्यस्मरण कोरोना परिस्थिती गंभीर असल्याने ठराविक व मोजकेच मित्र परिवार, नातेवाईक यांच्यामध्ये कोरोना चे नियम पाळून संपन्न झाले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng