१०% ची अट रद्द, आता आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत होणार सर्व जिल्ह्यांचा समावेश.

शिक्षक सहकार संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास यश.

मुंबई (बारामती झटका)

१०% च्या जाचक अटीमुळे हजारो बदलीपात्र शिक्षक वंचित होते. पण शिक्षक सहकार संघटनेच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे आज दि. १ जुन २०२२ रोजी शासनाने पत्रक काढुन ही १०% ची अट रद्द करुन सर्व जिल्ह्यांचा समावेश आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत करावा असे आदेश दिले.

शिक्षक सहकार संघटना ही आंतरजिल्हा बदली संदर्भात यशस्वी लढा देणारी संघटना आहे. ऑनलाईन बदल्या, ऑनलाईन कार्यमुक्ती, भ्रष्टाचार मुक्त बदल्या या सर्व बाबतीत शिक्षक सहकार संघटनेचा मोलाचा वाटा आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड सर यांच्या अभ्यासू व खंबीर नेतृत्वात तसेच राज्य नेते रवि अंबुले यांच्या मार्गदर्शनात तसेच संघटनेच्या प्रत्येक निष्ठावान पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने संघटनेने अनेक दुर्लक्षित पण अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दे यशस्वीरित्या सोडवले आहेत.

आंतर जिल्हा बदली जरी ऑनलाईन होत असली, तसेच हजारो बदल्या होत असतानाही अनेक समस्या आज आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत आहेत. १०% ची अट ही सर्वात गंभीर समस्या होती. यामुळेच अनेक शिक्षक आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असुनही वंचित होते. पहिल्या टप्प्यापासून शिक्षक सहकार संघटनेने याबाबत लढा तीव्र करत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.

अनेक मंत्रालयीन दौरे, सातत्यपूर्ण पाठपुरावा, अभ्यासगटासोबत चर्चा, ऑनलाईन व प्रत्यक्ष निवेदन देऊन या संदर्भात सातत्याने संघटनेने आपली बाजु मांडली. मागील आठवडय़ात पुणे येथे सर्व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीच्या बैठकीतही हा मुद्दा संघटनेचे राज्य सरचिटणीस निलेश देशमुख सर व संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिपक परचंडे सर यांनी प्रभावीपणे मांडला होता. संघटनेच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित आज दि. १ जुन २०२२ रोजचे शासनाचे पत्र आहे.

संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड, राज्य नेते रवि अंबुले, राज्य कार्याध्यक्ष दिपक परचंडे, राज्य सरचिटणीस निलेश देशमुख, राज्य प्रसिद्धीप्रमुख गजानन देवकत्ते व सर्व पदाधिकाऱ्यांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleहाॅटेल आईसाहेब बिर्याणी हाऊस फॅमिली रेस्टॉरंटचा शुभारंभ धुमधडाक्यात साजरा होणार आहे.
Next articleजांबूड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here