वाघोली (बारामती झटका)
दि २७ रोजी सातारा यथे२४ वी ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धा रोजी पार पडली. या स्पर्धेमध्ये खुल्या ओपन गटात सोलापूर जिल्हा कडून शिवनेरी तालीम अकलूज व माळीनगर ता माळशिरस येथील पै तेजस उर्फ दादासाहेब गायकवाड यांनी १३० किलो वजन या खुल्या गटातून ब्राँझ पथक मिळवून विजय प्राप्त केला.सदर यश प्राप्त करून केलेल्या कामगिरीने शिवनेरी तालीम अकलूज आणि सोलापूर जिल्ह्याला बहुमान मिळवून दिला त्याबद्दल शिवनेरी च्या वतीने २८/१०/२०२१ रोजी भव्य असा सत्कार करण्यात आला याप्रसंगी शिवनेरी तालमीचे वस्ताद व माळशिरस तालुका शिवसेना प्रमुख नामदेव नाना वाघमारे तसेच सोलापूर जिल्हा कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे अध्यक्ष पै युवराज तात्या केचे ,शिवनेरी ची कुस्ती कोच जयसिंग बंडगर सर, शिवनेरी तालमीचे मार्गदर्शक वीरेंद्र अण्णा वाघमारे ,महालक्ष्मी उद्योग समूहाचे मालक पै मेघराज भोसले ,वस्ताद बाळासाहेब गवसणे व शिवनेरी तालमीचे सर्व पैलवान उपस्थित होते.पै तेजस गायकवाड यांनी मिळवलेल्या यशाबद्दल उपस्थित सर्व पैलवानांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng