ॲट्रॉसिटीच्या समर्थनार्थ माळशिरस तहशील कार्यालयावर बहुजन विराट मोर्चाचा कार्यक्रम संपन्न.

माळशिरस येथील नालंदा बुद्ध विहार ते तहसील कार्यालयावर मोर्चात भर उन्हात माता भगिनीचा सहभाग.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील बहुजन संघर्ष कृती समितीचा ॲट्रॉसिटीच्या समर्थनार्थ बहुजन विराट मोर्चा चे आयोजन केलेले होते सदरचा मोर्चा नालंदा बुद्ध विहार येथून भगवान गौतम बुद्धांची वंदना घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली भर उन्हात तहसील कार्यालयाकडे घोषणाबाजी करत मोर्चा निघालेला अहोत सदरच्या मोर्चामध्ये माता भगिनींचा सहभाग मोठा होता सदर मोर्चाचे तहसील कार्यालय येथे सभेत रूपांतर झाले.
बहुजन विराट मोर्चात आंबेडकरी चळवळीतील सर्व संघटना, लहुजी शक्ती सेना, होलार समाज संघटना, मुस्लिम संघर्ष समिती, रामोशी संघटना, भीम आर्मी संघटना, मातंग एकता आंदोलन या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले.
माळशिरस चे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांना माळशिरस तालुका बहुजन संघर्ष कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले सदरच्या निवेदनामध्ये महाराष्ट्र भूमी ही संतांची आणि महामानवांची भूमी आहे म्हणूनच महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र संबोधले जाते परंतु याच महाराष्ट्रात पुरोगामित्वाचा मुखवटा पांघरून वावरणाऱ्या प्रवृत्ती वाढीस लागले आहेत त्यामुळे दलितांवरील अन्याय अत्याचार वाढ होताना दिसत आहे त्यामुळेच आधीच दबलेला असलेला समाज जास्तच दबावात गेलेला दिसत आहे.


त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलेल्या ॲट्रॉसिटी चा कायदा त्याची अंमलबजावणी खडक आणि निपक्षपाती पणे व्हावे हा उदात्त हेतू ठेवून खालील मागण्याघेऊन 21 10 20 21 रोजी माळशिरस तहसील कार्यालयावर विराट मोर्चा घेतलेला आहे त्यामुळे आपण आमच्या मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा लाखोंच्या संख्येने बहुजन मुंबईत मंत्रालयावर धडक पतील याची आपण नोंद घ्यावी
१) ॲट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी व त्याची निष्पक्षपाती पणाने चौकशी व्हावी.
२) जातीय अत्याचारांमध्ये बळी पडलेल्या पीडिता वरच 395 सारखे खोट्या दरोड्याचे गुन्हे दाखल करून त्याची शारीरिक मानसिक व आर्थिक छळ केला जातो तो त्वरित बंद करण्यात यावा.
३) अन्यायग्रस्त कुटुंबाचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे.
४) सामाजिक न्याय विभागाचे निधी इतरत्र न वळविता मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पूर्ववत मिळावी.
५) अनुसूचित जाती-जमातींमधील पदोन्नती आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे.


अशा मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दिलेले असून सदर निवेदनावर नंदकुमार केंगार, दयानंद धाईंजे, एन के साळवे, विकास धाईंजे बाळासो सपताळे, प्रदीप धाईंजे, प्राध्यापक धनाजी साठे, धनाजी पवार, राजाभाऊ खिलारे, प्राध्यापक शहाजी फारसे, महादेव तुपसौदर, किरणतात्या धाईंजे, काकासो जाधव, रोहित सोरटे, राजाभाऊ सावंत, युवराज रणदिवे, दत्ता सावंत, दत्तात्रय कांबळे पाटील, रेखाताई कांबळे, किशोरभाऊ सोनवणे, बाळासाहेब धाईंजे, सोमनाथ भोसले, दादासो नामदास, वराज सातपुते, वैभवजी गीते, युवराज सातपुते, एन के धाईंजे, विनोद रणदिवे, बुवानाना धाईंजे, विशाल साळवे, सुनील ढोबळे, हनुमंत बिरलिंगे, समीर सोरटे, दादासाहेब ढवळे, रमेश धाईंजे, श्यामराव भोसले, मिलिंद सरतापे, रविराज बनसोडे, भीमराव भुसनर, डॉक्टर वाघमारे, लालासो गेजगे, पप्पूदादा गायकवाड, आदींच्या स्वाक्षऱ्या असणारे निवेदन देण्यात आले.
बहुजन विराट मोर्चामध्ये महिला पुरुष शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदविला होता. नालंदा बुद्ध विहार ते तहसील कार्यालय शांततेत मोर्चा पार पडला माळशिरस चे पोलीस निरीक्षक दीपक रत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleधैर्यशील मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते तरंगफळ येथे सोलार कृषी पंपाचे उद्घाटन
Next articleस्वेरीत आल्यावर ऑक्सफर्ड मध्ये आल्याचा भास झाला – आयएएस जे.पी.डांगे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here