Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी, विरोधक व अपक्ष यांच्यात लढत होण्याची शक्यता…

सहकारी संस्था मतदार संघातील मतदारांना अकरा मतांचा अधिकार तर ग्रामपंचायत मतदार संघातील मतदारांना चार मतांचा अधिकार..

माळशिरस ( बारामती झटका )

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सुरेख रंगत वाढलेली आहे. सत्ताधारी भाजप मोहिते पाटील गट व विरोधी गटाकडून फत्तेसिंह माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर, भाजपचे के. के. पाटील यांनी मोठे आव्हान उभे केलेले आहे. त्यामुळे अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी मोहिते पाटील गट, विरोधी गट आणि अपक्ष श्रीनिवास कदम पाटील यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सहकारी सेवा सोसायटी मतदार संघात अकरा उमेदवार यांना मतदान करण्याचा मतदारांना अधिकार आहे. मतदारांना चार मतपत्रिका मिळतील. त्यामध्ये सर्वसाधारण गटात सात मतदानाचा अधिकार आहे. महिला प्रतिनिधी गटात दोन मताचा अधिकार आहे. अनुसूचित जाती व जमाती मतदार संघात एक मताचा अधिकार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटात एक मताचा अधिकार आहे. असे सहकारी मतदार संघातील मतदारांना पसंतीच्या अकरा उमेदवारांना मतदान करता येणार आहे.

ग्रामपंचायत मतदार संघातील मतदारांना चार मताचा अधिकार आहे. तीन मत पत्रिका त्यांना मिळणार आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण गटात दोन मताचा अधिकार आहे. अनुसूचित जाती व जमाती गटात एक मताचा अधिकार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटात एक महत्त्वाचा अधिकार आहे. असे ग्रामपंचायत मतदार संघातील मतदारांना चार मताचा अधिकार आहे.

व्यापारी मतदारसंघातील मतदारांना एक मतपत्रिका मिळणार आहे. त्यामधील दोन मताचा अधिकार आहे. हमाल व व्यापारी मतदार संघात एक मतपत्रिका मिळणार आहे. त्यामधील एक मताचा अधिकार आहे.

सहकारी सेवा सोसायटी मतदार संघातील मतदारांना अकरा मते देण्याचा अधिकार, ग्रामपंचायत मतदार संघातील मतदारांना चार मते देण्याचा अधिकार, व्यापारी मतदार संघात मतदारांना दोन मते देण्याचा अधिकार, हमाल व तोलार मतदार संघात एक मत देण्याचा अधिकार आहे.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाकडून कपबशी चिन्हाची मागणी आहे. विरोधी गटाकडून शिट्टी चिन्हाची मागणी आहे, तर अपक्ष उमेदवार श्रीनिवास कदम पाटील यांनी हॅट (टोपी) चिन्हाची मागणी केलेली आहे. सदर चिन्हाचे कोणीही मागणी केलेली नसल्याने श्रीनिवास कदम पाटील यांचे हॅट (टोपी) चिन्हावर निर्विवाद वर्चस्व आहे. सहकारी संस्था व ग्रामपंचायत मतदार संघात सर्वसाधारण जागेतून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी कबड्डी विरोधक शिट्टी व अपक्ष हॅट (टोपी) यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

  1. La mejor aplicación de control parental para proteger a sus hijos – monitoriza en secreto GPS, SMS, llamadas, WhatsApp, Facebook, ubicación. Puede monitorear de forma remota las actividades del teléfono móvil después de descargar e instalar apk en el teléfono de destino.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort