Uncategorized

अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती सामाजीक प्रवर्गास सुवर्णसंधी !!

माळशिरस (बारामती झटका)

समाजातील अनुसुचित जमाती व अनुसुचित जाती या समाजातील प्रवर्गसाठी कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या खुप योजना आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत पौष्टीक व भरडधान्य व कडधान्य विकास कार्यक्रमामधून पीक प्रात्यक्षिक, प्रशिक्षण, शेतीशाळा, प्रमाणित बियाणे, प्रकल्प व प्रकल्पाबाहेरील विविध प्रकारच्या निविष्ठा, राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत यांत्रीकिकरण ट्रॅक्टर अवजारे सर्व बाबी, राज्य यांत्रीकिकरण उपअभियान विविध बाबी घटक, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान मधील शेततळे अस्तरीकरण पीक संरक्षण औजारे यांत्रीकरण घटक, सुक्ष्म सिंचन योजना, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत शेततळे, क्रॉपसॅप व हार्टशेप निविष्ठा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत पंपसेट डिझेल शेट पाणीपुरवठा साधणे, कांदाचाळ पॅकहाऊस शेडनेट हाऊस, डाळमिल, चॉफ कटर फळबाग क्षेत्र विस्तार पूर्नरज्जीवन रायपनीग चेंबर इत्यादी योजनासाठी शासनाची भरीव तरतुद आहे.

या प्रवर्गातील लाभार्थीना माहिती नसल्यामुळे अर्जाचे प्रमाणही खुप कमी आहे. यामुळे वर्षानुवर्ष निधी खर्च होत नाही. तरी या उपलब्ध निधीचा अनुदान स्वरूपात लाभ घेण्याची सुवर्णसंधी अनुसुचित जाती अनुसुचित जमाती प्रवर्गाला उपलब्ध आहे. तरी ॲग्री महाडीबीटी महापोर्टलवर विविध बाबीची आवश्यकता व निवडीचे निकष अधिन राहून ७/१२, ८अ, आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पनाचा दाखला, वैध जात प्रमाणपत्रासह अर्ज करण्याचे व आधिक माहितीसाठी व सामाजिक समावेशनसाठी नजीकचे कृषि विभाग कार्यालयांशी संपर्क करण्याचे आवाहन मंडळ कृषि अधिकारी नातेपुते श्री. सतिश कचरे यांनी केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort