Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

एकशिव ग्रामपंचायतीच्या बिनविरोध उपसरपंच पदी मुमताज मुलाणी यांची निवड

कार्यक्षम सरपंच शहाजीदादा धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड

एकशिव ( बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील एकशिव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मुमताज बाबासाहब मुलाणी यांची बिनविरोध निवड कार्यक्षम सरपंच श्री. शहाजीदादा धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी श्री. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली आहे.

यावेळी ग्रामसेवक श्री. पवार भाऊसाहेब, माजी उपसरपंच श्री. भारत सूर्यकांत साळवे, ग्रामपंचायत सदस्या माजी उपसरपंच सौ. शिल्पा रणजित पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ. वैशाली सुनील जानकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. सुवर्णा दत्ता कांबळे, ग्रामपंचायत सदस्य श्री. दशरथ नाना जाधव, ग्रामपंचायत सदस्य श्री. राहुल अवघडे, प्रतापसिंह मोहिते पाटील विद्यालय शिवपुरी सभापती श्री. सुग्रीव शिवराम मोटे, मा. उपसरपंच श्री‌ रणजित पाटील, मा. ग्रामपंचायत सदस्य श्री. महादेव आण्णासाहेब पाटील, श्री. अंकुश मुरलीधर जाधव, माजी उपसरपंच श्री. सुरेश शंकर जाधव, श्री. किसन लक्ष्मण रुपनवर, श्री. पांडुरंग जगन्नाथ पाटील, तोशीब अल्लाउद्दीन मुलाणी, प्रहार संघटना संस्थापक श्री. लक्ष्मण नामदेव गावडे, श्री. विठ्ठल महादेव पाटील, NDMJ संघटना माळशिरस तालुकाचे श्री. दत्ता आड्याप्पा कांबळे, ( DK ) टिपू सुलतान ग्रुप एकशिवचे अध्यक्ष वाहिद बाबासाहब मुलाणी, शिवपुरी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अय्याज जैनुद्दीन मुलाणी, श्री. तात्यासाहेब जाधव, श्री. भगवान जगू जाधव, श्री. संतोष लक्ष्मण जाधव, श्री. नवनाथ जाधव, अझर मुलाणी आदी उपस्थित होते.

निवडणूक बिनविरोध पार पाडलेबद्दल सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मुलाणी परिवार यांनी मानले. नुतन उपसरपंच मुमताज मुलाणी यांना भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण करीत आनंद उत्सव साजरा केला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort