Uncategorized

करमाळा नगरपालिका स्वबळावर लढवा – प्रा. शिवाजीराव सावंत

करमाळा (बारामती झटका)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या लोकप्रियतेमुळे व त्यांच्या कामाच्या धडाकेबाज निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनता खुश झाली असून येणाऱ्या काळात करमाळा नगरपालिकेवर ही शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी तयारी करावी, असे आवाहन शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी केले.

करमाळा शहरातील किल्ला वेसमधील पहिल्या बाळासाहेबांचे शिवसेना शाखेचे उद्घाटन प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख महेश चिवटे, शहर प्रमुख संजय आप्पा शीलवंत, सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, उपशहर प्रमुख राजेंद्र काळे, नागेश गुरव, शिवसेना नेते प्रदीप शिंदे, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, भाजपचे तालुकाप्रमुख गणेश चिवटे, महाराष्ट्र केसरी अफसर जाधव, उपतालुका प्रमुख भाजपा रामभाऊ ढाणे या सर्व शिवसेना-भाजप युतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना प्राध्यापक शिवाजीराव सावंत म्हणाले की, बाळासाहेबांची शिवसेना व भारतीय जनता पार्टी युतीचे महाराष्ट्रातील गतिमान सरकार असून तीन महिन्यात बहात्तर लोकप्रिय निर्णय घेऊन जनतेचे प्रश्न मार्गी लावले आहेत.

करमाळा तालुक्यातील प्रलंबित सर्व प्रश्नांसाठी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत मंत्रालयात लवकरच बैठक लावण्यात येणार असून यातून करमाळ्यातील सर्व प्रश्न मार्गी लावू, असा विश्वास प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

करमाळा शहरातील वीस वार्डात बाळासाहेबांचे शिवसेनेचे शाखा उघडणार असल्याचे सांगत भारतीय जनता पार्टीला बरोबर घेऊन नवीन पर्याय शहरापुढे देऊ, असा विश्वास संजय शीलवंत व उपशहर प्रमुख नागेश गुरव यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort