Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

तिसरी आघाडी : वेळापूर ग्रामपंचायत निवडणूक जनकल्याण ग्रामविकास पॅनलचा चमत्कार दिसणार.

तरंगफळ गावाची पुनरावृत्ती वेळापूर गावात माया उर्फ सदाशिव रामचंद्र अडसूळ यांच्या रूपाने होणार का ?

ग्रामपंचायतमधून काहीतरी मिळावे हा उद्देश नसून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचा आहे – थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार माया उर्फ सदाशिव अडसूळ

वेळापूर ( बारामती झटका )

वेळापूर ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीत जनकल्याण ग्रामविकास पॅनलचे प्रमुख काकासाहेब जाधव यांनी पॅनलचे सरपंच पदाचे अधिकृत उमेदवार तृतीयपंथी माया उर्फ सदाशिव रामचंद्र अडसूळ यांना सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये सामील न होता तिसऱ्या आघाडीची स्थापना केलेली आहे. थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच म्हणून तरंगफळ येथील ज्ञानदेव उर्फ माऊली कांबळे यांनी महाराष्ट्रात नाव केलेले होते. तरंगफळ गावची पुनरावृत्ती वेळापूर गावात माया उर्फ सदाशिव रामचंद्र अडसूळ यांच्या रूपाने होणार का ? असा प्रश्न माळशिरस तालुक्यात चर्चीला जात आहे.

जनकल्याण ग्रामविकास पॅनलचे काकासाहेब जाधव यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर जाहीरनामा छापलेला आहे. सदरच्या जाहीरनाम्यामध्ये वेळापूर गावाला भारतातील वायफाय गाव बनवायचे आहे. पहिल्या सहा महिन्यांमध्ये पालखी चौक, महादेव मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, बस स्टॅन्ड, मस्जिद, पंचशील नगर, बुद्ध विहार, शाहू-फुले-आंबेडकर नगर, साठे नगर, क्रांती चौक, बाजार तळ अशा बारा ठिकाणी वायफाय केंद्र उभारणार. वेळापूर मधील जिल्हा परिषदेच्या 14 शाळा, 6 मिनी अंगणवाड्या व 17 मोठ्या अंगणवाड्या यांना सोलर पॅनल बसवून वीज बिलाचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यात येईल. वेळापूर बस स्टॅन्ड पालखी चौक व वेळापूर सांगोला रोड दूध डेअरी अशा तीन ठिकाणी महिला व मुलींसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष तयार करणे. वेळापूर बस स्टँड साठी पर्यायी जागा उपलब्ध करून प्रशस्त असे आधुनिक सोयी सुविधेने सुसज्ज बस स्टॅन्ड उभारण्यासाठी सहकार्य करणे. भविष्यात कोरोना सारख्या भयंकर आजाराचा धोका लक्षात घेऊन वेळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 15 ऑक्सिजन बेड उपलब्ध करावयाचे आहेत.

महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना वेगवेगळ्या लघु उद्योगाचे प्रशिक्षण देऊन महिलांना सक्षम बनवायचे आहे. पुणे पंढरपूर रस्त्यामुळे व्यवसाय धोक्यात आलेल्या व्यावसायिकांचे पुनर्वसन योग्य ठिकाणी करायचे आहे. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सर्वांना 24 तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणीपुरवठा तलावाची क्षमता वाढवायची आहे. वक्तृत्व करणारी लोक नेतृत्व करत असतात, म्हणून शालेय विद्यार्थी व तरुणांना वक्तृत्व प्रशिक्षण देण्यासाठी वक्तृत्व प्रशिक्षण केंद्र उभारायचे आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक आधार केंद्र उभारणार. सर्व महापुरुषांचे पुतळे एकाच ठिकाणी उभे करून त्या ठिकाणी प्रशस्त असे वाचनालय उभारून त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी व नागरिकांना वाचनाची सोय करण्यात येईल. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून गावातील आठवडा बाजार तळासाठी पर्यायी जागा उपलब्ध करायची आहे. गावातील प्रमुख ठिकाणी तसेच प्रत्येक वार्डातील प्रमुख ठिकाणी नोटीस बोर्ड बसवून त्यावर प्रत्येक मासिक मीटिंगच्या प्रोसिडिंग नकला चिटकवून ग्रामपंचायत कारभाराची माहिती सर्व नागरिकांना उपलब्ध करून द्यायची आहे. प्रत्येक ग्रामसभेच्या अगोदर प्रत्येक वार्डात ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत वार्ड ग्रामसभा घेतल्या नंतरच सार्वजनिक ग्रामसभा घेणार. घरकुल संदर्भात संपूर्ण गावाचा फेर सर्वे करून आजपर्यंत घरकुलाचा लाभ मिळाला नाही, अशा कुटुंबांचा फेर सर्वे करून त्यांना घरकुलाचा लाभ द्यायचा आहे. मुस्लिम धर्मीयांचे श्रद्धास्थान असणारे इदग्याचे सुशोभीकरण करायचे आहे. मुस्लिम दफनभूमीचा प्रलंबित प्रश्न वक्फ बोर्डासमोर मांडून तो कायम सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. वेळापूर कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व कॅनल कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाझर तलाव या पाण्याच्या स्तोत्रावर पाणी वापर संस्था निर्माण करून त्या शेतकऱ्यांना कार्यान्वित करून सिंचन व्यवस्थापन सुरळीत चालण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करायचा आहे. नीरा उजवा कालवा विक्रिका क्रमांक चार वरून अतिवाहक (Escape) निर्माण करून पाणी पुरवठ्याची टंचाई नष्ट करण्यात येईल, असे सर्व जनतेच्या जिव्हाळ्याचे विषय घेऊन जाहीरनामा तयार करून मतदारांसमोर मतं मागण्याकरिता जनकल्याण ग्रामविकास पॅनलचे पॅनल प्रमुख काकासाहेब जाधव थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदाचे उमेदवार माया उर्फ सदाशिव रामचंद्र अडसूळ वार्ड क्रमांक एक मधील दत्तात्रय महादेव चंदनशिवे, राहुल कुंडलिक नाईकनवरे, अश्विनी विजयकुमार जाधव, वार्ड क्रमांक दोन मध्ये गणेश सुनील मंडले, दिलीप सुखदेव बोडरे, माधुरी मिलिंद साठे, वार्ड क्रमांक तीन मध्ये विश्वास बाळासो सरवदे, हसीना हुसेन आतार, वार्ड क्रमांक चार मध्ये आतार हुसेन (शकील) मौला, विद्या सुनील साठे, वार्ड क्रमांक पाच मध्ये औदुंबर उर्फ पिनु उत्तम येडगे, मोनाली नवनाथ चंदनशिव, वार्ड क्रमांक सहा मध्ये राहुल मधुकर गायकवाड, असे उमेदवार उभे केलेले आहे.

सरपंच पदाचे उमेदवार यांना छताचा पंखा व सहा वर्गातील 14 सदस्य यांना फुटबॉल, बॅट, अंगठी अशी चिन्हे घेतलेली आहेत. वेळापूर ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच तिसरी आघाडीने आव्हान उभे केलेले आहे. वेळापूर ग्रामपंचायत निवडणुकीत जनकल्याण ग्रामविकास पॅनलचा चमत्कार दिसणार असल्याचे सुज्ञ नागरिक व मतदार यांच्यामधून बोलले जात आहे.

वेळापूर गावातील मतदारांनी सेवा करण्याची संधी दिल्यास लाभापासून वंचित असणाऱ्या घटकांना न्याय मिळवून देणार. सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची अडीअडचणीची कामे करून लोकाभिमुख प्रशासनाचा कारभार चालविण्यात ग्रामपंचायत मधून काहीतरी मिळवणे हा हेतू नसून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचा मनोदय आहे. सर्व महापुरुषांचा आदर्श घेऊन समाजामध्ये आदर्श ग्रामपंचायत कारभार कसा होईल, यासाठी कायम प्रयत्नशील असल्याचे मत थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदाचे उमेदवार माया उर्फ सदाशिव अडसूळ यांनी बारामती झटक्याशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून मतदारांनी मतदान रुपी आशीर्वाद द्यावा, असे नम्र आवाहन केलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort