Uncategorizedताज्या बातम्या

दिव्याखाली अंधार… आरटीओ वाहनांचा नाही इन्शुरन्स #आरटीओ #इन्शुरन्स

वेगमर्यादा ओलांडल्याने झालेला दंड भरला नसल्याचे आले समोर

वाघोली (बारामती झटका)

#पुणे #आरटीओ कार्यालयाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, पुणे आरटीओ कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी ज्या वाहनांच्या मदतीने प्रवास करतात, ज्या वाहनातून इतरांवर कारवाई करतात, त्या वाहनांचा इन्शुरन्स संपल्याचे व वेग मर्यादा ओलांडल्याप्रकरणी झालेला दंड भरला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

सरकारी आकडेवारीनुसार देशभरात जवळपास अंदाजे ४० ते ३० टक्के वाहने इन्शुरन्स नसतानाही रस्त्यावर धावत आहेत. नियमानुसार प्रत्येक वाहनाचा थर्ड पार्टी विमा असणे आवश्यक आहे. यातून अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी मदत होते. #’पीयूसी’ मुळे #प्रदूषण नियंत्रणाला हातभार लागतो. तसेच भंगार वाहने रस्त्यावर धावण्यापासून रोखताही येतात. त्यामुळे पीयूसी इन्शुरन्स नसणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, आरटीओ कार्यालयाचे पथक ज्या वाहनातून प्रवास करतात, त्या वाहनाची काय स्थिती आहे, याची पडताळणी #’वाहन’, #’परिवहन’ या संकेतस्थळाच्या आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून करण्यात आली. तेव्हा पुणे आरटीओ कार्यालयाचे अधिकारी वापरत असलेले एमएच ०४ केआर ६४७२ हे वाहन इन्शुरन्स विनाच धावत असल्याचे आढळून आले.

तर याच गाडीमध्ये अधिकारी प्रवास करत असताना #पुणे-मुंबई एक्सप्रेस महामार्गावर १ जुलै २०२२ रोजी २३ वाजून ६ मिनिटांनी वाहनाचे स्पीड ११३ ताशी किमी स्पीड मर्यादा ओलांडल्या प्रकरणी २ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. तो देखील आजपर्यंत भरण्यात आलेला नाही, असे आढळून आले.

काय आढळून आले ?
वाहन क्रमांक एम एच ०४ के आर ६४७२ या चार चाकी वाहनाची नोंदणी २४ जून २०२१ मध्ये झाली आहे. फिटनेस ची मुदत २३ जून २०३६ पर्यंत आहे. परंतु, या वाहनाचे इन्शुरन्स ही मुदत १ नोव्हेंबर २०२२ रोजी संपलेली आढळून आली. तर १ जुलै २०२२ रोजी #वेग मर्यादा ओलांडल्या प्रकरणी २ हजार रुपयांचा दंड देखील बाकी दिसून येत आहे. मोबाईल ॲपबरोबर शासनाच्या संकेतस्थळावरून ही बाब समोर आली.

किती महिने दुर्लक्ष व ते का ,?
या वाहनाचे #इन्शुरन्स १ नोव्हेंबर २०२२ रोजी संपला असल्याचे ॲपची ऑनलाईन यंत्रणा दाखवीत आहे. ‘वाहन’ ‘परिवहन’ या संकेतस्थळावर इन्शुरन्सची स्थितीच दाखवत नाही. फिजिकली कागदपत्रे पहावे, अशी सूचना दर्शवली जाते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort