Uncategorized

परप्रांतीय स्थलांतरित कामगार कायद्याची अंमलबजावणी करा; नाभिक समाजाची मागणी

अकलूज (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील अकलूज, वेळापूर, नातेपुते, श्रीपुर, माळशिरस या शहरांतील सलूनमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली राज्यातील परप्रांतीय कामगार कामासाठी ठेवलेले आहेत. या परप्रांतीयांची कायद्यान्वये पोलीस स्टेशनमध्ये फोटो, ओळखपत्र इत्यादींसह नोंदणी करून घ्यावी, ही मागणी राष्ट्रीय नाभिक युवक संघटनेतर्फे करण्यात आलेली आहे. याबद्दल अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी व अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुगावकर साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे.

सलून व्यवसायावर अतिक्रमण झाल्यामुळे पारंपारिक व्यवसाय असणाऱ्या नाभिक समाजाच्या उपजीविकेचा प्रश्न उद्भवला आहे. त्यामुळे नाभिक समाज बांधवांनी परप्रांतीयांना कामावर ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

“आमचा सलून व्यवसाय करणाऱ्यांना विरोध नसून आमचा विरोध हा परप्रांतीयांना आहे”, असे किरण भांगे यांनी बोलताना सांगितले.

यावेळी सचिन डांगे, राहुल सराटे, मुरलीधर सुरवसे, अमर राऊत, धनेश डांगे, महेश पांडवे, अजिनाथ वाघमारे, सोमनाथ सपकाळ, विठ्ठल जाधव, मारुती ननवरे, अनिल ठोंबरे, चांगदेव साळुंखे, शिवाजी भांगे, संजय दळवी, इंद्रजीत जमदाडे, रोहित काळे, नानासाहेब साळुंखे, अण्णा भांगे, शंकर जाधव, बबलू काशीद, संजय दळवी, चंद्रकांत ठोंबरे, सोमनाथ राऊत, प्रज्वल काळे, सचिन सराटे, दशरथ काशीद, संजय दळवी, श्रीनाथ काशीद, दादासाहेब काशीद, शशिकांत राऊत, केशवराव लोखंडे, अतूल माने, रफिक सय्यद यांचेसह समाजबांधव उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort