Uncategorizedताज्या बातम्या

पांडुरंग कारखाना ‘बेस्ट को-जनरेशन’ प्रकल्प पुरस्काराने सन्मानित

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खा. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते मुंबई येथे पुरस्कार प्रदान

श्रीपुर (बारामती झटका)

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचा ‘बेस्ट को-जनरेशन प्रकल्प’ हा पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खा. शरदचंद्रजी पवार, उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांच्याहस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आला.

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने महाराष्ट्रात पहिल्यांदा को-जनरेशन प्रकल्प उभारून सहकारी साखर कारखान्यांमध्ये आदर्श निर्माण केला आहे. को-जनरेशन मध्ये केलेल्या सर्वोच्च कामगिरीचा विचार करून को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने ६७ के.जी. बॉयलरच्या आतील को-जनरेशनसाठी देश पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे पुरस्कार देताना कारखान्याने को-जनरेशनमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा उल्लेख नितीन गडकरी यांनी करून कारखान्याचे कौतुक केले. यावेळी विश्वजीत कदम, को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, केंद्रीय सचिव दिनेश जगदाळे आदी उपस्थित होते.

हा पुरस्कार कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक, व्हाईस चेअरमन कैलास खुळे, संचालक तानाजी वाघमोडे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी आदींनी स्वीकारला. को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांनी हंगाम 2018-19 ते 2020-21 या तीन वर्षाच्या कालावधीत केलेल्या कामगिरीच्या आधारावर 67 के. जी. च्या आतील बॉयलर असणाऱ्या को-जनरेशन प्रकल्पास देश पातळीवरील प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार दिला आहे. त्यामध्ये श्री पांडुरंग कारखान्याने कमीत कमी बगॅसमध्ये जास्तीत जास्त वीज निर्मिती, आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेले कार्बन क्रेडिट, कमी उत्पादन खर्च, कारखान्यास मिळालेले आयएसओ सर्टिफिकेट व कारखान्याच्या असलेल्या सुरक्षा योजना, कारखान्याचा सौरऊर्जा प्रकल्प, कमीत कमी पाणी वापर, पाण्याचा पुनर्वापर, पाचटाचा वापर करून वीज निर्मिती, को-जनरेशन प्लांटची क्षमता वापर या सर्व बाबींचा विचार करून देण्यात आला आहे.

श्री पांडुरंग कारखान्याचा ज्यावेळी को-जनरेशन प्लांट उभा केला त्यावेळी महाराष्ट्रात को-जनरेशन प्लांटचे प्रमाण कमी होते. परंतु स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या आशीर्वादाने व कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक तसेच संचालक मंडळाच्या सहकार्याने कारखान्याचा को-जनरेशन प्लांट यशस्वी चालून त्यामधून जास्तीत जास्त वीज निर्मिती करून कारखान्यास आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण केला आहे.

कारखान्याने को-जनरेशनमध्ये केलेल्या सर्वोच्च कामगिरीमुळे कारखान्यास को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेकडून देश पातळीवरील सर्वोच्च को-जनरेशन प्रकल्प म्हणून गौरविण्यात आले आहे. यावेळी कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक, व्हाईस चेअरमन कैलास खुळे यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी व अधिकारी, कामगार यांचे अभिनंदन केले.

कारखान्यास चार पुरस्कार
‘पांडुरंग’ ला प्रथम क्रमांकाचा देश पातळीवर ‘बेस्ट को-जनरेशन प्रकल्प’ पुरस्काराबरोबर कारखान्याचे जनरल मॅनेजर सचिन विभुते यांना ‘बेस्ट कोजन मॅनेजर’ हा पुरस्कार तसेच समीर सय्यद यांना ‘बेस्ट इन्स्ट्रुमेंट मॅनेजर’ म्हणून पुरस्कार व सत्यवान जाधव यांना ‘बेस्ट डीएम प्लांट मॅनेजर’ म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कारखान्यास को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया कडून एकूण चार पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कारखान्यास आजपर्यंत 41 पुरस्कार मिळाले असून हे पुरस्कार कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक, व्हाईस चेअरमन कैलास खुळे, सर्व संचालक मंडळ आणि अधिकारी यांनी केलेल्या सर्वोच्च कामगिरीच्या जोरावर मिळाले असून यापुढेही कारखाना अशाच प्रकारे सर्वोच्च कामगिरी करेल.‌- डॉ. यशवंत कुलकर्णी, कार्यकारी संचालक

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort