Uncategorizedताज्या बातम्या

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची नातेपुते नगरपंचायतीला दमदार कामगिरी, साडेचार कोटी रुपयाचा निधी मंजूर.

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ. राम सातपुते यांचा विकासकामात धुमधडाका.

नातेपुते ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माढा लोकसभेचे माजी खासदार विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा मतदार संघात विकासकामांचा धुमधडाका सुरू आहे.
लोकप्रिय दमदार आ. राम सातपुते यांनी नातेपुते नगरपंचायतीच्या विकास कामासाठी दमदार कामगिरी करून साडेचार कोटी रुपयाचा निधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर केलेला आहे.

दि. 4 जुलै रोजी मौजे नातेपुते ता. माळशिरस येथील नगरपंचायतीच्या विविध विकासकामांसाठी साडेचार कोटी रुपयांच्या निधीच्या मागणीचे पत्र दिले होते. या पत्राची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत व विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी तात्काळ लक्ष देऊन नातेपुते नगरपंचायतीच्या विविध विकासकामांसाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला शिष्याच्या मागणीला गुरूंनी भेट दिलेली आहे.

नातेपुते नगरपंचायत व नागरिकांच्यावतीने विशेषकरून वडार समाजाच्यावतीने लोकप्रिय आमदार राम सातपुते यांचे विशेष आभार मानले जात आहेत.

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नातेपुते नगरपंचायतीच्या विविध विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष देऊन आ. राम सातपुते यांच्या मागणीचा विचार करून तात्काळ साडेचार कोटी रुपये मंजूर केले असून यानंतर माळशिरस नगरपंचायतीच्या विविध विकासकामांसाठीही निधी देण्याचे आ‌. राम सातपुते यांना आश्वासित केले असून नातेपुते नगरपंचायतीच्या प्रभागांमधील रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण करणे, मंदिरासमोरील उद्यानाचे सुशोभीकरण करणे, सभामंडप बांधणे, स्मशानभूमी कंपाउंड व सुशोभीकरण करणे, अंडरग्राउंड गटार तयार करणे, वडार समाजासाठी शौचालय बांधणे, वडार समाज सभागृह सुशोभीकरण करणे, कॅनॉलवरील रस्ते तयार करणे, ज्या प्रभागांमध्ये रस्ते करणे आवश्यक आहे व ज्यांची मागणी झाली आहे, अशा सर्व रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या कामासाठी हे साडेचार कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती आ. राम सातपुते यांनी दिली.

ठाकरे व पवार सरकारच्या काळात भाजपच्या आमदारांना निधीबाबत सापत्न वागणूक दिली जात होती. परंतु राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिंदे व फडणवीस सरकारच्या कार्यकाळात भाजपच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी सढळ हाताने शिंदे व फडणवीस सरकार मदत करीत असून ही मदत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम लोकप्रतिनिधी म्हणून मी करीत आहे. – आ.राम सातपुते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

  1. Wow, awesome weblog format! How long have you ever been running a
    blog for? you make blogging glance easy. The entire look of your web site
    is magnificent, as well as the content! You can see similar here ecommerce

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort