Uncategorizedकृषिवार्ताताज्या बातम्या

सदाशिवनगर, श्रीपुर आणि शिवपुरी मळ्यातील जमिनी वाटपापासून वंचित राहिलेल्या खंडकरी शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरू

सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांची उपोषण स्थळाला सदिच्छा भेट

खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथ वाघमोडे आणि भानुदास सालगुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण सुरू

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर, श्रीपुर आणि शिवपुरी मळ्यातील जमिनी वाटपापासून वंचित राहिलेल्या सर्व खंडकरी शेतकऱ्यांनी खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथ वाघमोडे आणि भानुदास सालगुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगळवार दि. १४/२/२०२३ पासून अकलूज येथील प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. तसे व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ पुणे यांना निवेदन देखील दिले आहे. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे दरम्यान सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोरभैय्या सूळ पाटील यांनी उपोषण स्थळाला सदिच्छा भेट दिली आहे.

सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, आम्ही सर्व महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ सदाशिवनगर, श्रीपुर शिवपुरी मळ्यामधील खंडकरी शेतकरी आहोत. आमची जमीन वाटपाची प्रक्रिया दहा वर्षांपासून प्रलंबित आहे‌. शेती महामंडळाने सुचवलेल्या जमिनी नापीक, करली व खराब तुकड्या तुकड्याच्या आहेत. अशा जमिनी शेती महामंडळ आम्हाला वाटपास देत आहे. आम्ही सर्व खंडकरी या शेती महामंडळ ऑफिसेस, उपविभागीय कार्यालय अकलूज व संबंधित कार्यालयाचे हेलपाटे मारत आहोत. कितीतरी वेळा अधिकाऱ्यांना भेटलो पण आमच्या अर्जाची दखल घेतली जात नाही. त्यामुळे जमीन वाटपास विलंब झाल्यामुळे कार्यालयाकडे हेलपाटे मारावे लागतात. अर्थातच आमचे आर्थिक नुकसान होते आहे. तसेच दहा वर्षांचे उत्पन्न बुडाले आहे. या सर्वांमुळे आमची आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली आहे.

तरी सर्व मंजूर असलेल्या खंडकरांच्या जमिनी त्यांच्या मागणीनुसार देऊन त्यांचा लवकरात लवकर एकत्रित आराखडा मंजुरीची प्रक्रिया संबंधित कार्यालयाकडून व्हावी व जमीन वाटपाचे आदेश व्हावेत, मागणीनुसार शेतकऱ्यांना जमीन मिळावी, ज्यांचा नमुना क्र. १ मंजूर झाला आहे त्या, शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीची जमीन उपलब्ध करून द्यावी, खंडकरांना ज्या जमिनी मिळाल्या आहेत त्या वर्ग दोनच्या आहेत त्या जमिनी वर्ग एक करून मिळाव्यात, ज्यांना जमिनी मिळाल्या आहेत त्यांची मोजणी करून द्यावी, गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेला खंडकऱ्यांच्या बाबतीत तातडीने कार्यवाही व्हावी, ज्यांची जमीन एक एकर पेक्षा कमी गेली आहे ती त्या खंडकऱ्यांना एकर द्यावी, खंडकरी जमिनी वाटप करताना त्यांना पाट, पाणी व रस्ता द्यावा, ज्या जमिनीतून चारी किंवा रस्ता गेला आहे ते क्षेत्र वगळून जमिनी वाटप करून द्याव्यात, माळशिरस तालुक्यात खंडकरी शेतकऱ्यांना ज्यांच्या जमिनी वाटप करायच्या राहिलेल्या आहेत त्यांच्यासाठी अनुभवी प्रांताधिकारी किंवा फक्त खंडकरी प्रश्नांसाठी स्वतंत्र अधिकारी नेमावा, २/१०/१९७५ प्रमाणे युनिट धरून जमीन वाटप करून मिळावी, औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानुसार (स्टे) प्रलंबित खंडकरी शेतकऱ्यांना जमीन वाटप होईपर्यंत संयुक्त शेतीस भाडेतत्त्वावर जमिनी देऊ नयेत व त्यात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये, अशा मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort