Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

सदाशिवनगर साखर कारखाना सुरू झाला आणि सालगुडे पाटील पॅनलच्या ग्रामपंचायत निवडणुकीत मुळावर आला.

सदाशिवनगर ग्रामपंचायतीवरील सालगुडे पाटील गटाची सत्ता गेली तर पुरंदावडे ग्रामपंचायतीवर निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले

पुरंदावडे गावातील ओवाळ यांचा स्वाभिमान दिसून आला, तर सालगुडे पाटील पार्टीतील नेत्यांना व कार्यकर्त्यांना स्वाभिमान येणार का ?

सदाशिवनगर ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असणारा श्री शंकर सहकारी साखर कारखाना, सदाशिवनगर गेल्या पाच वर्षांमध्ये बंद अवस्थेत होता. सदरचा कारखाना गेल्या वर्षापासून सुरू झालेला आहे. कारखाना सुरू झाला आणि सालगुडे पाटील पॅनलच्या सदाशिवनगर पुरंदावडे ग्रामपंचायत निवडणुकीत मुळावर आला, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे.

सालगुडे पाटील गटाची सत्ता सदाशिवनगर ग्रामपंचायतीवर होती. त्यामध्ये परिवर्तन होऊन सत्ता बदल झालेला आहे तर पुरंदावडे ग्रामपंचायत निवडणुकीत कारखान्याच्या हस्तक्षेपामुळे निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पुरंदावडे गावातील ओवाळ यांचा स्वाभिमान दिसून आला, पण सालगुडे पाटील पार्टीतील नेत्यांना व कार्यकर्त्यांना स्वाभिमान येणार का ? अशी जोरदार चर्चा सदाशिवनगर व पुरंदावडे गावात सालगुडे पाटील पॅनल मधील गोरगरीब व सर्वसामान्य मतदारांना वाटत आहे.

सदाशिवनगर व पुरंदावडे ग्रामपंचायतीमध्ये सालगुडे पाटील पार्टीने आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे नाव पॅनलला दिलेले होते, तर विरोधी गटाकडून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पॅनलला नाव दिलेले होते. वास्तविक पाहता दोन्हीही मोहिते पाटील यांचे पॅनल होते मात्र, कारखाना प्रशासनाने व दादांनी सालगुडे पाटील पार्टीच्या विरोधी भूमिका घेतली असल्याची चर्चा दोन्ही गावांमध्ये उघड उघड सुरू आहे. कारखान्याच्या आवारात पुरंदावडे गावच्या सालगुडे पाटील गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ. रिया ओवाळ यांचे दीर जालू ओवाळ यांचे कॅन्टीन सुरू होते. त्यांना सहकार महर्षी शंकरराव माहिती पाटील पॅनलच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा प्रचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या मात्र, ओवाळ स्वाभिमानी‌. त्यांनी ओवाळ परिवाराशी चर्चा करून कॅन्टीन सोडून दिले आणि आपला स्वाभिमान दाखवून दिलेला आहे.

सदाशिवनगर ग्रामपंचायतीमध्ये सालगुडे पाटील गटाची सत्ता परिवर्तन करण्यासाठी दादांनी उमेदवार वीरकुमार दोशी व अनंतलाल दोशी यांना गाडीमध्ये बसवून फिरवल्याने मतदारांना इशारा काफी है, असे समजून व प्रशासनाकडून हस्ते परहस्ते निरोप देण्यात आलेले होते. निवडणूक सुरू झाली त्यावेळेस माणिकराव सुळे पाटील यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात होते. मात्र, दादांच्या सहभागाने वीरकुमार दोशी यांचा विजय झालेला आहे.

सदाशिवनगर निवडणुकीतील फरक मोठा आहे मात्र, पुरंदावडे निवडणुकीतील ओवाळ यांनी विजय जवळ आणलेला होता. मात्र, कारखाना प्रशासनामुळे निसटत्या पराभवाला रिया ओवाळ यांना सामोरे जावे लागलेले आहे. सौ. राणी मोहिते यांचा विजय झाला आहे. सालगुडे पाटील पार्टीतील सर्वसामान्य व तळागाळातील जनता व मतदान दादांची व कारखाना प्रशासनाची भूमिका पुतना मावशीसारखी असेल तर सरळ सरळ फाटी ओढून राजकारण करावे, अन्यथा वेगळा विचार करावा लागेल. या मानसिकतेमध्ये सालगुडे पाटील पॅनलमधील स्वाभिमानी जनता व मतदार यांच्यामधून सूर निघत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

  1. Ready to blast your message across the digital universe? Just as you’re engaging with this ad, imagine your brand message reaching countless website contact forms worldwide! Starting at just under $100, unlock the potential to reach 1 million forms. Reach out to me below for details

    P. Stewart
    Email: [email protected]
    Skype: live:.cid.2bc4ed65aa40fb3b

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort