Uncategorizedताज्या बातम्या

सोमनाथ हुलगे यांच्यासह अन्य चार जणांविरोधात अकलूज पोलीस स्टेशन येथे ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल

विजय नागरी पतसंस्थेचे वसुली कर्मचारी संतोष ऐवळे यांना थकीत कर्जाच्या वसुली दरम्यान जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल

अकलूज ( बारामती झटका )

विजय ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, अकलूज या संस्थेचे वसुली कर्मचारी संतोषबापू ऐवळे, रा. मसूदमळा अकलूज यांनी सोमनाथ हुलगे, नागेश हुलगे, सोमनाथ यांचा लहान भाऊ असे, रा. माळीनगर व राहुल ढेरे, साजिद सय्यद रा. अकलूज अशा पाच लोकांवर अकलूज पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता 1960 कलम 327, 324, 323, 504, 506, 143, 147, 149 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ( अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1979 कलम 3(1),3(2) अन्वये अकलूज पोलीस स्टेशन येथे दि. 22/07/2022 रोजी 5.50 वा. गुन्हा नोंद झालेला आहे.

तक्रारदार संतोष बापू ऐवळे यांनी अकलूज पोलीस स्टेशन येथे दिलेल्या जबाबामध्ये विजय ग्रामीण बिगर शेती पतसंस्था अकलूज, ता. माळशिरस येथे वसुली कर्मचारी म्हणून काम करीत आहे. बँकेतील बँक मॅनेजर उघडे साहेब व कर्मचारी महादेव सुर्वे, किरण बेडवर वसुलीचे काम पाहतात.

पतसंस्थेचे कर्जदार सोमनाथ हुलगे यांना सन 2003 साली एक लाख रुपये दिलेले होते. त्यांनी आजपर्यंत 28 हजार 936 रुपये भरले आहेत. त्यांची थकीत कर्ज रक्कम सहा लाख 50 हजार भरण्यासाठी पतसंस्थेकडून त्यांना वारंवार नोटिसा पाठवलेल्या आहेत. आम्ही त्यांना पैसे भरण्याची विनंती करीत होतो. त्यावेळेस त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केलेली आहे.

त्यावेळेस अन्य चार लोकांनी मारहाण करून माझे पोटाजवळ चाकू धरला व तुझे तुकडे करून टाकतो, असे म्हणत होते‌. आरडाओरडा करून पळून गेलो, अशी तक्रार अकलूज पोलीस स्टेशन येथे दिलेली आहे. अकलूज पोलीस स्टेशन पुढील तपास करीत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort