नामदेवराव माने पाटील यांना आयुष्यामध्ये सर्व काही मिळाले, जिवनाचा शेवटसुध्दा सार्थकी लागला – माजी आमदार रामहरी रुपनवर.एकादशीला देह ठेवला व धार्मिक वृत्तीमुळे गळ्यात तुळशीची माळ नसताना हरी नामाच्या जयघोषात अंत्ययात्रा निघाली कण्हेर ( बारामती झटका )माणसाच्या आयुष्यामध्ये जन्म, लग्न, संसार, लेकरेबाळे, नातवंडे, परतवंडे आणि समाजामध्ये चांगले वागून मान सन्मान मिळवणे, म्हणजेच आयुष्यामध्ये सर्व काही मिळाले असे असते, तेच नामदेवराव माने पाटील यांच्या आयुष्यामध्ये सर्व काही मिळाले आणि आयुष्याचा शेवटसुद्धा एकादशीच्या दिवशी देह ठेवून सार्थकी लागलेला आहे, असे अग्निसंस्कार प्रसंगी लोकाकुल वातावरणात भावपूर्ण आदरांजली वाहत असताना विधानपरिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी बोलताना सांगितले. कन्हेर ता. माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार नामदेवराव श्रीपती माने पाटील यांच्या वयाच्या ९० व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले होते. माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य गौतमआबा माने पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांचे ते वडील होते. स्व. नामदेवराव व श्रीमती यशोदाबाई यांनी प्रतिकूल परिस्थितीत संसार करून आपल्या मुलांवर चांगले संस्कार केलेले होते. अफाट कष्टातून त्यांनी दरिद्री संसाराचा स्वर्ग बनवलेला होता. वेळप्रसंगी दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला गेले मात्र, स्वाभिमानाने व धार्मिक वृत्तीने जीवन जगलेले होते. त्यांच्या मुलांनी कार्यकर्तृत्वावर समाजामध्ये मानमरातब, पद, प्रतिष्ठा,, पैसाअडका, गाडी, बंगला सर्व काही कमावलेले आहे. मुलांनी आई-वडिलांची सेवा चांगल्या प्रकारे केलेली होती. वयोवृद्ध आई-वडिलांसाठी अचानक दवाखान्यात अथवा इतर कोठे जायचे असल्यास दाराच्या समोर चार चाकी गाडी कायम राखून ठेवली जात होती. नामदेवराव यांनी गुरुवारी पहाटे पाच वाजता प्रात:विधीला जाऊन आल्यानंतर उठाउठी त्यांना मरण आलेले होते. ते धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या गळ्यात माळ नव्हती, तरीसुद्धा ग्रामस्थांनी एकादशीचा दिवस असल्याने स्व. नामदेव यांची अंत्ययात्रा हरी नामाच्या गजरामध्ये काढलेली होती. सर्व मुलांनी घराच्या शेजारी शेतामध्ये रानमळा या ठिकाणी अंत्यसंस्कार शोकाकुल वातावरणामध्ये करण्यात आलेले आहेत‌. याप्रसंगी माजी आमदार रामहरी रुपनवर, गणपतराव वाघमोडे, उत्तमराव जानकर, मामासाहेब पांढरे, सोपानराव नारनवर, साहेबराव देशमुख, बाळासाहेब लवटे पाटील, बाळासाहेब कर्णवर पाटील, तुकाराम देशमुख, ॲड. सोमनाथ वाघमोडे, विकासदादा धाईंजे, बाळासाहेब धाईजे, बाळासाहेब सरगर, रणजीत मोटे, पांडुरंग वाघमोडे, मधुकर वाघमोडे, माऊली पाटील, अतुलशेठ बावकर, मोहितशेठ जाधव, नाथाआबा लवटे, युवराज झंजे, सचिन रणनवरे विष्णुपंत नारनवर, सर्जेराव घोडके, आप्पासाहेब टेळे, तात्यासाहेब वाघमोडे आदी मान्यवरांसह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य, कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजी माजी संचालक, विविध गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व कुस्ती क्षेत्रातील वस्ताद मंडळी व मल्ल यांच्यासह कण्हेर पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्व. नामदेवराव माने पाटील यांच्यावर कन्हेर येथील रानमळा राहत्या निवासस्थानी शेजारील शेतात अंत्यसंस्कार गुरुवार दि. 06/10/2022 रोजी करण्यात आलेले आहेत. रक्षा विसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम शनिवार दि.08/10/2022 रोजी सकाळी 7.30 वाजता होणार आहे.नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

माने पाटील यांना आयुष्यामध्ये सर्व काही मिळाले, जिवनाचा शेवटसुध्दा सार्थकी लागला – माजी आमदार रामहरी रुपनवर.
एकादशीला देह ठेवला व धार्मिक वृत्तीमुळे गळ्यात तुळशीची माळ नसताना हरी नामाच्या जयघोषात अंत्ययात्रा निघाली

कण्हेर ( बारामती झटका )

माणसाच्या आयुष्यामध्ये जन्म, लग्न, संसार, लेकरेबाळे, नातवंडे, परतवंडे आणि समाजामध्ये चांगले वागून मान सन्मान मिळवणे, म्हणजेच आयुष्यामध्ये सर्व काही मिळाले असे असते, तेच नामदेवराव माने पाटील यांच्या आयुष्यामध्ये सर्व काही मिळाले आणि आयुष्याचा शेवटसुद्धा एकादशीच्या दिवशी देह ठेवून सार्थकी लागलेला आहे, असे अग्निसंस्कार प्रसंगी लोकाकुल वातावरणात भावपूर्ण आदरांजली वाहत असताना विधानपरिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी बोलताना सांगितले. कन्हेर ता. माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार नामदेवराव श्रीपती माने पाटील यांच्या वयाच्या ९० व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले होते. माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य गौतमआबा माने पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांचे ते वडील होते.

स्व. नामदेवराव व श्रीमती यशोदाबाई यांनी प्रतिकूल परिस्थितीत संसार करून आपल्या मुलांवर चांगले संस्कार केलेले होते. अफाट कष्टातून त्यांनी दरिद्री संसाराचा स्वर्ग बनवलेला होता. वेळप्रसंगी दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला गेले मात्र, स्वाभिमानाने व धार्मिक वृत्तीने जीवन जगलेले होते. त्यांच्या मुलांनी कार्यकर्तृत्वावर समाजामध्ये मानमरातब, पद, प्रतिष्ठा,, पैसाअडका, गाडी, बंगला सर्व काही कमावलेले आहे. मुलांनी आई-वडिलांची सेवा चांगल्या प्रकारे केलेली होती. वयोवृद्ध आई-वडिलांसाठी अचानक दवाखान्यात अथवा इतर कोठे जायचे असल्यास दाराच्या समोर चार चाकी गाडी कायम राखून ठेवली जात होती. नामदेवराव यांनी गुरुवारी पहाटे पाच वाजता प्रात:विधीला जाऊन आल्यानंतर उठाउठी त्यांना मरण आलेले होते. ते धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या गळ्यात माळ नव्हती, तरीसुद्धा ग्रामस्थांनी एकादशीचा दिवस असल्याने स्व. नामदेव यांची अंत्ययात्रा हरी नामाच्या गजरामध्ये काढलेली होती.

सर्व मुलांनी घराच्या शेजारी शेतामध्ये रानमळा या ठिकाणी अंत्यसंस्कार शोकाकुल वातावरणामध्ये करण्यात आलेले आहेत‌. याप्रसंगी माजी आमदार रामहरी रुपनवर, गणपतराव वाघमोडे, उत्तमराव जानकर, मामासाहेब पांढरे, सोपानराव नारनवर, साहेबराव देशमुख, बाळासाहेब लवटे पाटील, बाळासाहेब कर्णवर पाटील, तुकाराम देशमुख, ॲड. सोमनाथ वाघमोडे, विकासदादा धाईंजे, बाळासाहेब धाईजे, बाळासाहेब सरगर, रणजीत मोटे, पांडुरंग वाघमोडे, मधुकर वाघमोडे, माऊली पाटील, अतुलशेठ बावकर, मोहितशेठ जाधव, नाथाआबा लवटे, युवराज झंजे, सचिन रणनवरे विष्णुपंत नारनवर, सर्जेराव घोडके, आप्पासाहेब टेळे, तात्यासाहेब वाघमोडे आदी मान्यवरांसह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य, कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजी माजी संचालक, विविध गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व कुस्ती क्षेत्रातील वस्ताद मंडळी व मल्ल यांच्यासह कण्हेर पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व. नामदेवराव माने पाटील यांच्यावर कन्हेर येथील रानमळा राहत्या निवासस्थानी शेजारील शेतात अंत्यसंस्कार गुरुवार दि. 06/10/2022 रोजी करण्यात आलेले आहेत. रक्षा विसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम शनिवार दि.08/10/2022 रोजी सकाळी 7.30 वाजता होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवाघोली येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महिला आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
Next articleनामदेवराव माने पाटील यांना आयुष्यामध्ये सर्व काही मिळाले, जिवनाचा शेवटसुध्दा सार्थकी लागला – माजी आमदार रामहरी रुपनवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here