उप अभियंता रणनवरे यांच्याच गावात रस्त्याचा वाजला बोजवारा; त्रस्त नागरिक झाले बेजार….
गोरडवाडी-मांडकी-सरकारी दवाखाना-मांडकी गाव-लक्ष्मी मंदिर रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे न होता निकृष्ट दर्जाचा झाला, त्रस्त नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया…
मांडकी (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी-मांडकी-सरकारी दवाखाना ते मांडकी गाव लक्ष्मी मंदिर येथील लाखो रुपये खर्चून तयार केलेला रस्ता अंदाजपत्रक प्रमाणे नसून निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. माळशिरस पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी उप अभियंता रणनवरे यांच्या गावात रस्त्याचा बोजवारा वाजलेला असल्याने मांडकी गावातील नागरिक बेजार झालेले आहेत. गावात रस्ता अधिकाऱ्यांनी व्यवस्थित करून घेणे गरजेचे असताना स्वतःच्या गावात अशी रस्त्याची दैनिक अवस्था तर तालुक्यात इतर गावात रस्त्यांची काय अवस्था असेल ?, असाही सूर मांडकी परिसरातील नागरिकांमधून येत आहेत.
मांडकी गावामध्ये ज्येष्ठ नागरिक, शाळेतील विद्यार्थी, वयोवृद्ध व आजारी, महिला भगिनी यांना प्रवास करण्याकरता सुखकर रस्ता व्हावा यासाठी लोकप्रतिनिधींनी लाखो रुपये सदरच्या रस्त्यावर खर्ची केलेले आहेत. मात्र, अधिकारी व ठेकेदार यांच्या आर्थिक हित संबंधामुळे रस्ता अंदाज पत्रकाप्रमाणे तयार केलेला नसून निकृष्ट दर्जाचा केलेला आहे. सदरच्या रस्त्यावर मुरूम सुद्धा व्यवस्थित टाकलेला नाही. सदरच्या रस्त्याचा बोजवारा उडालेला आहे. गावातील स्थानिक नागरिक यांच्यामधून तीव्र संतापाची लाट उसळलेली असताना गावातील सुशिक्षित पुणे, मुंबई येथे असणाऱ्या नोकरदार वर्गामध्ये ही सदरच्या रस्त्याविषयी प्रचंड नाराजी येत आहे.
सदरचा रस्ता अधिकारी व ठेकेदार यांच्या फायद्यासाठी झालेला आहे का, असाही प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. लवकरच सदरच्या रस्त्याचे अंदाजपत्रकाप्रमाणे काम झाले नाही तर वेगळी भूमिका घ्यावी लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व सुशिक्षित नोकरदार वर्गांमधून येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
I was recommended this website by my cousin I am not sure whether this post is written by him as nobody else know such detailed about my trouble You are amazing Thanks
Insightful read! Your analysis is spot-on. For more detailed information, visit: READ MORE. Eager to see what others have to say!