ताज्या बातम्यासामाजिक

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानपत्र लेखक सुरेश साळुंकेंचा गौरव

बीड (बारामती झटका)

बीडचे सन्मानपत्र लेखक तथा निवेदक सुरेश साळुंकेंचा छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकारी मा. सौ.
अंजलीताई धानोरकरांच्या शुभहस्ते सन्मानपत्र, लेखन आणि स्वातंत्र्य सेनानी रामरावजी आवरगावकर विधी महाविद्यालयाच्यावतीने उत्कृष्ट निवेदक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ जिल्हा बीडच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने नितिन क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात नारी शक्तीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने नाभिक सखी सन्मान पुरस्कारांतर्गत विविध पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते.

यातील पुरस्कार प्राप्त सत्कार मूर्तींचे समाजावर प्रभाव टाकणारे कार्य नेटक्या आणि श्रवणीय शब्दात सन्मानपत्र चित्रित केल्याबद्दल आणि स्वातंत्र्य सेनानी रामराव आवरगावकर विधी महाविद्यालयाच्यावतीने “उत्कृष्ट निवेदक पुरस्कार” मिळाल्याबद्दल सन्मानपत्र लेखक निवेदक सुरेश साळुंकेंचा कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या तथा छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकारी मा. सौ. अंजलीताई धानोरकरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

स्वतः लिखित सन्मानपत्राचे वाचन निवेदक सुरेश साळुंकेंनींच आपल्या आशयघन ओजस्वी रसाळतेने केले. तेव्हा प्रमुख पाहुण्या उपजिल्हाधिकारी सौ. अंजलीताई धानोरकरांनी सुरेश साळुंकेंच्या वाचनाची, आवाजाची, विद्याभ्यासाची प्रशंसा केली. या अगोदर निवेदक सुरेश साळुंकेंनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतुन राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात महंतांचे, किर्तनकारांचे, उद्योगपतींचे, शिवजयंतीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्य निर्मिती कार्यात सहभागी झालेल्या मुरारबाजी देशपांडे, येसाजी कंक आणि कान्होजीराजे जेधेंच्या तेराव्या वंशाचे, वैश्य सोनार समाजाच्या राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यासाठी सेवक ते न्यायाधीशांसाठी ५१, माजलगाव येथे झालेल्या मराठवाडा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या संमेलनात ३९ सन्मानपत्र लिहिले. तर सहस्त्रचंद्रदर्शन, अमृतमहोत्सव, मॅरेज ॲनिवरसरी, सुवर्ण महोत्सवासाठी कृतज्ञतापत्र लिहून सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःची “शब्दमुद्रा” उमटवली आहे.

सन्मानपत्र लेखनाचे यश आणि त्या यशाच्या अनुषंगाने मिळालेला सर्व मानसन्मान हे केवळ आपल्याला अ आ इ ई शिकवणाऱ्या शिक्षकांची आणि आम्हा भावंडांच्या शिक्षणासाठी अहोरात्र लोकांचे कपडे धुवून इस्त्री करुन परिश्रम करणाऱ्या बाई-बांची आहे, असे निवेदन करताना आवर्जून म्हटले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button