उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर…
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार गटाच्या कार्यकर्त्यांची दौरा यशस्वी करण्यासाठी जंगी तयारी…
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचा एक गट घेऊन सामील झाल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाच्या मेळाव्यासाठी येत असल्याने अजितदादा पवार यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जंगी तयारी केलेली आहे.
राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे विद्यमान सदस्य व अजितदादा यांचे खंदे समर्थक सुरेशआबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष तथा माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुका युवक अध्यक्ष राहुल सावंत यांच्यासह राज्य, जिल्हा, तालुका कार्यकारणी पदाधिकारी मोठ्या संख्येने सोलापूर जिल्ह्यातील मेळाव्याकडे फौज फाटा घेऊन निघालेले आहेत.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सरकारमध्ये सामील झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळे स्वरूप आलेले आहे. सोलापूर जिल्ह्यात अजितदादा पवार यांचा स्वतंत्र गट आहे. त्यांच्या विचाराचे अनेक नेते व कार्यकर्ते आहेत. सोलापूरच्या मेळाव्यात अजितदादा पवार काय बोलणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. यासाठी बारामती झटका यूट्यूब चॅनल वर सदरच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
I enjoyed reading this article. Its thought-provoking and well-presented. Lets discuss this further. Check out my profile!