ताज्या बातम्याराजकारण

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाचे निष्ठावान कार्यकर्ते दत्तात्रय ढेकळे यांचे शासकीय सदस्य पदी निवड…

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुरेशआबा पालवे पाटील, तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निवड

माळशिरस (बारामती झटका)

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेशआबा पालवे पाटील व माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माळशिरस तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उंबरे दहिगाव गावचे थोर सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे माळशिरस तालुका अध्यक्ष निष्ठावान कार्यकर्ते दत्तात्रय ढेकळे यांची “मुख्यमंत्री लाडकी बहीण” शासकीय योजनेच्या माळशिरस तालुका कमिटीवर सदस्य पदी करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक व विश्वासू म्हणून सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुरेशआबा पालवे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांच्या सहकार्याने माळशिरस तालुक्यात अजितदादा पवार गटाचे निष्ठावान कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केलेले आहे. सुरेशआबा पाटील व शिवाजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय ढेकळे यांनी माळशिरस तालुक्यात युवकांचे संघटन निर्माण केलेले आहे. दत्तात्रय ढेकळे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष पद आहे. माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाची टिकटिक राष्ट्रवादीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी वाढवलेली आहे.

सध्या महाराष्ट्रामध्ये “मुख्यमंत्री लाडकी बहीण” शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचली पाहिजे, यासाठी शासनाने तालुकास्तरावर “लाडकी बहीण” योजनेची शासकीय कमिट्या निर्माण केलेल्या आहेत. त्यामध्ये सोज्वळ व सौजन्यशील निष्ठावान कार्यकर्ते दत्तात्रय ढेकळे यांची सदस्य पदी निवड करून निष्ठावान कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवलेले आहे. दत्तात्रय ढेकळे यांच्या निवडीने उंबरे दहिगाव पंचक्रोशीसह माळशिरस तालुक्यात समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण होऊन शुभेच्छांचा वर्षाव नवनिर्वाचित शासकीय सदस्य दत्तात्रय ढेकळे यांच्यावर सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button