श्री. तुळशीदास भीमराव शिंदे यांचे दुःखद निधन..

बार्शी गावचे सुपुत्र व मीरा-भाईंदरचे अप्पर पोलीस आयुक्त श्री. दत्तात्रय तुळशीदास शिंदे यांना पितृषोक
बार्शी (बारामती झटका)
बार्शी तालुक्यातील चिंचोली येथील शेतकरी, वारकरी श्री. तुळशीदास भीमराव शिंदे (दादा), वय – ९८ वर्ष यांचे ठाणे येथे निवासस्थानी आज दि. ११-१०-२०२४ रोजी सकाळी पावणे पाच वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
मीरा-भाईंदर येथे कार्यरत असलेले अपर पोलीस आयुक्त श्री. दत्तात्रय तुळशीदास (डी. टी.) शिंदे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी सौ. कांताबाई, तीन मुले, तीन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्यावर ममदापुर येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधीला श्री. डी. टी. शिंदे यांचा मोठा मित्र परिवार, आप्तेष्ट उपस्थित होता.

चिंचोली परिसरातील एक मोठं व्यक्तिमत्त्व आज हरपलं. अनेक कुटुंबातील लोकांना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची मदत केली. श्री. तुळशीदास शिंदे यांच्या निधनाने शिंदे कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परमेश्वर मृतात्म्यास शांती देवो व शिंदे कुटुंबियांना या दुखातून सावरण्याचे बळ देवो.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.