ताज्या बातम्याराजकारण

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या फलटण दौऱ्याच्या नियोजनाची बैठक पाणीदार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार..

कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या शुभहस्ते निरा-देवघर, एमआयडीसी, धोम बलकवडी, फलटण-बारामती रेल्वे सह विविध विकासकामांचा शुभारंभ होणार.

फलटण (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते निरा देवघर, नाईक बोमवाडी MIDC, धोमबलकवडी, फलटण-बारामती रेल्वे, भुमिपुजन सोहळा संपन्न होणार आहे. भव्य जाहीर सभा होणार यासाठी दि. १२/१/२०२३ रोजी सकाळी ९ वाजता नियोजनाची बैठक रेस्ट हाऊस, कोळकी येथे माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न होणार आहे.

तरी सर्व पदाधिकारी, सुपरवारियर, महिला पदाधिकारी, युवावर्ग मोर्चा आघाडीचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, भाजपा फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, भाजपा फलटण विधानसभा प्रभारी सचिन कांबळे पाटील, भाजप फलटण शहर अध्यक्ष अमोल सस्ते यांनी आवाहन केलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button