ताज्या बातम्याराजकारण

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या प्रीती भोजनाचा आस्वाद घेणार..

प्रतापगडाला पुन्हा गतवैभव प्राप्त होण्यासाठी जनसेवा संघटनेचे जनसेवक यांची आग्रही भूमिका..

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माढा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या प्रचार दौऱ्यानिमित्त माळशिरस तालुक्यात अकलूज येथे विजय चौकामध्ये सभेचे आयोजन केलेले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अकलूज येथील सभेपूर्वी जनसेवा संघटनेचे सर्वेसर्वा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या प्रतापगडावर प्रीती भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी येणार आहेत. लोकसभेच्या अनुषंगाने डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी ठोस भूमिका घ्यावी, अशी जनसेवा संघटनेचे जनसेवक यांची आग्रही भूमिका आहे. प्रतापगडाला पुन्हा गतवैभव प्राप्त होण्यासाठी हिच योग्य वेळ आहे, असे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या समर्थकांमधून चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात जनसेवा संघटनेचे सर्वेसर्वा व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी स्वतःचे राजकीय अस्तित्व कायम सिद्ध केलेले होते. शिवरत्न बंगला यांच्या प्रतिष्ठेसाठी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी प्रतापगडाच्या अस्तित्वाकडे कधीच पाहिलेले नाही. भाषणामध्ये पप्पा साहेब सांगत असत, प्रताप संपला तरी चालेल पण, विजयला संपवून देणार नाही, असे म्हणतच नव्हते तर तसे करत देखील होते. अनेक वेळा राजकीय निर्णय घेत असताना शिवरत्न बंगला कायम अडचण करीत होते, तरीसुद्धा प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी स्वतःच्या परिवाराच्या व राजकीय हिताची चिंता केलेली नव्हती. मात्र शिवरत्नकडून स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या पश्चात सपत्नीक वागणूक दिलेली होती. तरीसुद्धा निष्ठावान कार्यकर्ते व जनसेवा संघटनेचे शिलेदार यांच्या सहकार्याने डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे राजकीय, सामाजिक कार्य सुरू होते.

डॉ. धवलसिंह मोहिते पाटील सध्या सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष आहेत. देशात माढा लोकसभा मतदार संघात राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचा काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सोबत आहे. तरीसुद्धा कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, महायुती सोबत जाण्याचा निर्णय डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी घ्यावा. त्यामुळे स्नेहभोजनाऐवजी प्रीती भोजन आहे. भविष्यात दोन नेत्यांची अशीच प्रीती रहावी अशी कार्यकर्त्यांची मनोमन इच्छा आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button