उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माजी उपसभापती किशोरभैय्या सुळ पाटील यांच्या भेटीने मतदार संघाचे राजकारण वेगळ्या वळणावर…
निष्कलंक व चारित्र्यसंपन्न राजकीय वाटचाल असणारे माळशिरस तालुक्याचे युवा नेतृत्व किशोरभैया सुळ पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह…
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोरभैय्या सुळ पाटील यांनी माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भेट घेतल्यानंतर माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे राजकारण वेगळ्या वळणावर आलेले आहे. निष्कलंक व चारित्र्यसंपन्न राजकीय वाटचाल असणारे माळशिरस तालुक्याचे युवा नेतृत्व किशोरभैय्या सुळ पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या भेटीनंतर उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
मोरोची ता. माळशिरस, गावचे थोर सुपुत्र किशोरभैय्या सुळ पाटील यांचा राजकीय घरामध्येच जन्म झालेला असल्याने राजकारणाला गावच्या सरपंच पदापासून सुरुवात केलेली होती. संघटन कौशल्य, काम करण्याची हातोटी, थोरांचा आदर, लहानांचा सन्मान, वागण्यामध्ये साधेपणा, नेहमी हसतमुख काम करण्याची पद्धत, त्यामुळे पंचायत समिती गणामध्ये निवडून आलेले होते. माळशिरस पंचायत समितीच्या उपसभापतीपदी वर्णी लागलेली होती. त्यावेळेला माळशिरस पंचायत समितीच्या गावागावात, वाड्यावर व खेडोपाडी सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची कामे केलेली आहेत. तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये माळशिरस पंचायत समितीचा कारभार लोकाभिमुख करून लाभार्थी व गरजू लोकांना शासकीय योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील होते.
माळशिरस तालुक्याच्या कानाकोपऱ्यात किशोरभैय्या सूळ पाटील यांचा व्यक्तिगत संबंध असणारी तरुण वर्गांची फळी मोठ्या प्रमाणात आहे. लोकसभेच्या निवडणुकीत माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील व पारंपारिक मोहिते पाटील विरोधी गट एकत्र आलेले असल्याने माळशिरस तालुक्यात महायुतीचे उमेदवार यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्यात किशोरभैय्या सुळ पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. माळशिरस तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील जनतेला पर्यायी नेतृत्व उभा राहिलेले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुणे येथील बैठकीमध्ये किशोरभैय्या सुळ पाटील यांच्या अनुसूचित जातीच्या दाखल्याचा विषय झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांच्या समोर पाठीवर थाप टाकलेली होती.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत आहेत. माळशिरस विधानसभा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. महायुतीची उमेदवारी अद्यापपर्यंत जाहीर झालेली नाही. देवेंद्रजी फडणवीस आणि किशोरभैय्या सुळ पाटील यांच्या भेटीने माळशिरस विधानसभा मतदार संघात राजकारण वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जात आहे.
भविष्यात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षाचे निष्ठेने काम करण्याचे किशोरभैय्या सुळ पाटील व समर्थक यांच्यामधून बोलले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Sugar defender reviews : sugar defender reviews
Sugar defender reviews : sugar defender reviews
Sugar defender reviews : sugar defender reviews
Sugar defender reviews : sugar defender reviews
Thinker Pedia I appreciate you sharing this blog post. Thanks Again. Cool.