उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कानमंत्राने युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवराज पुकळे यांची जबाबदारी वाढली…

मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथील सागर बंगला येथे भाजपा युवा मोर्चाचे सोलापूर ग्रामीण विभागाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष शिवराजभैय्या पुकळे यांनी सदिच्छा भेट घेतली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलेले असल्याने नूतन जिल्हाध्यक्ष शिवराजभैय्या पुकळे यांची जबाबदारी वाढलेली आहे.
पिलीव गावचे थोर सुपुत्र शिवराजभैय्या पुकळे यांनी सामाजिक जीवनापासून राजकारणाला सुरुवात केलेली आहे. भाषेवर प्रभुत्व असल्याने अंगामध्ये संघटन कौशल्य, तरुणांना एकत्र करण्याची ताकद आहे. ते तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले आहेत. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील पाण्याचा प्रश्न कायम ऐरणीवर असतो. निरा-देवधर प्रकल्पांमध्ये माळशिरस तालुक्यातील बावीस गावांचा समावेश आहे. उर्वरित गावांचा समावेश व्हावा, यासाठी संघर्ष समिती स्थापन करून माळशिरस तालुक्यातील दुष्काळी गावांमध्ये सभा, बैठका, आंदोलने घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केलेली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे सततचा पाठपुरावा करून निरा-देवधर च्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांचा समावेश केला. त्यामुळे राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाचे माळशिरस तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली. यशस्वीपणे तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विधानसभेच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पक्षाचे सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब उर्फ चेतनसिंह केदार सावंत यांनी भाजपा युवा मोर्चाचे सोलापूर ग्रामीण पंढरपूर विभागाचे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे.
जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आगामी विधानसभेच्या निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने आणि ताकदीनिशी काम करून पक्षाला भव्य आणि ऐतिहासिक यश मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे, सोलापुर जिल्हा पालकमंत्री श्री. चंद्रकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री श्री. मकरंद भाऊ देशपांडे, पाणीदार खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुपजी मोरे, भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते, आ. श्री. राजेंद्र भाऊ राऊत, माजी आमदार श्री. प्रशांत मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाचे जोमाने काम सुरू आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन सोलापूर ग्रामीण विभागाच्या पाच मतदार संघात युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम करावयाचे, याचा कानमंत्र दिलेला असल्याने जिल्हाध्यक्ष शिवराजभैय्या पुकळे यांनी रणनीतीला सुरुवात केलेली आहे. निश्चितपणे महायुतीच्या विजयामध्ये युवा मोर्चाची दमदार कामगिरी पहावयास मिळणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.