Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. अजितदादा पवार यांची वायनरी वर करडी नजर….

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या सरकारमधील 33 कॅबिनेट व 06 राज्य मंत्र्यांचा नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शपथविधी घेऊन खातेवाटप करण्यात आलेले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थ खात्याबरोबर राज्य उत्पादन शुल्क खात्याची जबाबदारी घेतलेली आहे. वायनरीबाबत अनेक कार्यकर्त्यांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे उत्पादन शुल्क तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री नामदार अजितदादा पवार यांची वायनरीवर करडी नजर असल्याचे निकटवर्ती यांच्याकडून बोलले जात आहे.

वायनरी मध्ये उत्पादन शुल्क बुडवून वायनरी बाहेर काढली जाऊन तरुणांना व्यसनाच्या आहारी घालवण्याचे वायनरी मालक काम करीत आहेत. त्यामुळे समाजामधील एकमेकांचे वितुष्ट वाढून अनेकांचे संसार उध्वस्त झालेले आहेत. आयुष्यामध्ये संसार उध्वस्त होऊ नये, तरुण पिढी व्यसनापासून अलिप्त व्हावी व राज्यकर्त्यांना चपराक बसावी यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या खात्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजितदादा पवार वायनरीच्या बेकायदेशीररित्या सुरू असणाऱ्या गोरख धंद्यावर लगाम घालतील, अशी निकटवर्ती यांच्याकडून चर्चा सुरू आहे. 31 डिसेंबर हा बेकायदेशीर वायनरी मालकांचा शेवटचा डिसेंबर असू शकतो असेही खात्रीलायक वृत्त हाती आलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button