उपविभागीय अधिकारी, अकलुज विभाग माळशिरस व तहसिल कार्यालय माळशिरस यांच्या वतीने महसूल सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

माळशिरस (बारामती झटका)
महसुल विभागामार्फत राज्यात दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी महसुल दिन व दि. १ ते ७ ऑगस्ट २०२५ या कलावधीत महसुल सप्ताह २०२५ साजरा करण्यात येत असुन त्या अंतर्गत उपविभागीय अधिकारी, अकलुज विभाग माळशिरस व तहसिल कार्यालय माळशिरस यांचेमार्फत दि. ०३/०८/२०२५ रोजी अतिक्रमण मुक्त पाणंद रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला.
सदरच्या उपक्रमात माळशिरस तालुक्यातील रस्त्याच्या दुर्तफा १७४५ वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच महसुल सप्ताह अंतर्गत दि. ०४/०८/२०२५ माळशिरस तालुक्यातील १२ मंडळातील मौजे १) पिलीव, २) गुरसाळे, ३) गोरडवाडी, ४) लवंग, ५) खुडुस, ६) माळशिरस, ७) महाळुंग श्रीपुर, ८) मेडद, ९) यशवंतनगर, १०) मळोली, ११) नातेपुते व १२) पुरंदावडे या बारा गावात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत १२ शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीरांना नागरिकांचा मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळाला. तसेच सदर शिबीरामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधीही मोठ्या स्वरुपात सहभागी झाले होते. सदर शिबीरामध्ये महसुल विभागामार्फत वाटप करणेत येणारे विविध प्रकारच्या १९९२ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच अॅग्रीस्टक अंतर्गत ७९० फॉर्म आयडींना मान्यता देण्यात आली.

विविध सामाजिक सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांचे डीबीटी प्रक्रियेचे कामकाज करण्यात आले. सदर शिबीरामध्ये कृषी, ग्रामविकास, पशुसंवर्धन, महावितरण, असे इतर विभागांनी सहभागी होवुन नागरिकांना त्यांचे अंतर्गत येणारे लाभाचे वाटप केले. प्रत्येक शिबीर अंतर्गत नाविन्यपुर्ण कार्यक्रमा अंतर्गत आरोग्य विभागाने एकुण ३३४ महिलांची आरोग्य तपासणी केली. सदरच्या शिबीरामध्ये महसुल विभाग व इतर विभाग मिळुन एकुण २६२७ लाभार्थ्यी लाभ घेत आहे.
सदरचे शिबीर मा. विजया पांगारकर उपविभागीय अधिकारी, माळशिरस विभाग अकलुज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश शेजूळ तहसिलदार माळशिरस यांचे नियंत्रणाखाली आयोजीत करण्यात आले होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



