ताज्या बातम्याराजकारण

वडिलांच वस्ताद पद व आईच्या नगराध्यक्ष पदावर काम करणारे सर्वात तरुण नगराध्यक्ष श्री. विजयराव देशमुख यांचा राजकीय जीवन प्रवास…..

६१ फाटा देशमुख पट्टा येथे वास्तव्यास असणारे नगराध्यक्ष विजयराव देशमुख यांचा ६० फाटा वाघमोडे पाटील यांच्याकडून जल्लोष….

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस कुस्ती क्षेत्राचं आगार समजलं जाते, अशा माळशिरस शहरातील पूर्वी धनगर तालीम या नावाने व सध्या राष्ट्रसेवा कुस्ती केंद्र माळशिरस अशा सुप्रसिद्ध असणाऱ्या तालमीचे वस्ताद बाजीराव देशमुख यांनी अनेक मल्ल घडविलेले आहेत. त्यामधीलच स्वतःचा मुलगा विजयराव देशमुख यांना सुद्धा कुस्तीतील धडे देऊन वस्ताद केलेले आहे. तर मातोश्री द्रोपदी बाजीराव देशमुख यांनी माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदावर काम करून राजकारणातील धडे विजयराव देशमुख यांना देऊन बंधू माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या सहकार्याने वडिलांचे वस्ताद पद व आईच्या नगराध्यक्ष पदावर काम करणारे सर्वात तरुण नगराध्यक्ष श्री. विजयराव देशमुख यांच्या आजपासून नगराध्यक्ष पदाच्या कारकीर्दीला सुरुवात होत आहे. त्यांचा राजकीय जीवन प्रवासात आई, वडील, बंधू, पत्नी, भावजय यांचा मोलाचा वाटा आहे. विजयराव देशमुख यांचं वास्तव्य ६१ फाटा देशमुख पट्टा येथे आहे. मात्र, नगराध्यक्ष विजयराव देशमुख यांचा ६० फाटा वाघमोडे पाटील यांच्याकडून बॅनरबाजीने जल्लोष केलेला आहे.

कुस्ती क्षेत्रामध्ये वस्ताद बाजीराव देशमुख यांनी दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे. महानमल्ल म्हणून त्यांची कुस्ती क्षेत्रात ओळख आहे. कुस्ती क्षेत्र संपल्यानंतर वैवाहिक जीवनाला सुरुवात केली. त्यांना सुरेखा व द्रौपदी अशा दोन धर्मपत्नी आहेत. त्यांना विजयराव, प्रतापराव व शामराव अशी तीन मुले. त्रिमूर्तींनी आई-वडिलांचा वसा व वारसा जपत समाजामध्ये देशमुख परिवारांचे नाव सातासमुद्रापलीकडे केलेले आहेत.

विजयराव देशमुख यांचा जन्म १ एप्रिल १९८४ साली झालेला आहे. घरातील कुस्ती क्षेत्र व शेती यामुळे विजयराव यांचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले होते. व्यवहार ज्ञानापुरते शिक्षण घेऊन कुस्तीतील धडे २००९ पर्यंत घेतलेले आहेत. २५/१२/२०११ साली कण्हेर गावचे हनुमंतबापू माने यांची कन्या स्वाती माने यांच्याशी विवाह होऊन वैवाहिक जीवनाला सुरुवात केली. विराज व साईराज दोन मुले आहेत. माळशिरस ग्रामपंचायतीचे माळशिरस नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले. त्यावेळेला मातोश्री द्रौपदी देशमुख यांना वार्ड क्रमांक चार मधून उभे केलेले होते. त्याच वेळी डॉक्टर आप्पासाहेब देशमुख हेही उभे राहिलेले होते. दोघेही दैदीप्यमान मतांनी निवडून आलेले होते. सुरुवातीस डॉ. आप्पासाहेब देशमुख उपनगराध्यक्ष बनलेले होते. त्यानंतर नगराध्यक्ष होण्याचा देशमुख परिवारातील पहिला मान द्रौपदी देशमुख यांना मिळालेला होता. नगराध्यक्ष द्रौपदी देशमुख असताना डॉ. आप्पासाहेब देशमुख व विजयराव देशमुख यांनी पदाची धुरा सांभाळलेली होती.

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार तत्कालीन खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांच्या सहकार्यातून माळशिरस नगरपंचायतीमध्ये विकासकामांचा डोंगर उभा केलेला होता. विजयराव देशमुख यांनी वार्ड क्रमांक ४ मधील मतदार व सर्वसामान्य जनतेच्या सार्वजनिक व व्यक्तिगत अडचणी सोडविलेल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्यांदा निवडणुकीत विजयराव देशमुख यांना नगरसेवक होण्याची संधी मतदारांनी दिलेली होती. खऱ्या अर्थाने केलेल्या विकासकामांची एक प्रकारे पोचपावतीच होती.

विजयराव देशमुख नगरसेवक झाले, त्यावेळेला त्यांना रामासारखे असणारे बंधू डॉ. आप्पासाहेब देशमुख व सीतामाईसारखी असणारी भावजय सौ. अर्चना आप्पासाहेब देशमुख यांचे मार्गदर्शन मिळत गेले. वडिलांचं छत्र हरपलं, श्रीमती सुरेखा व श्रीमती द्रौपदी यांनी मातृत्व व पितृत्वाची जबाबदारी पार पाडली. पत्नी स्वाती विजयराव देशमुख यांनी आपल्या पतीला साथ दिली. सौ. शोभा व श्री. प्रताप देशमुख, सौ. प्रियांका व श्री. शामराव देशमुख दोघे भाऊ व भावजया यांचीही मोलाची साथ मिळाली. त्यामुळे वडिलांचं वस्ताद पद व आईच्या नगराध्यक्ष पदावर काम करणारे सर्वात तरुण नगराध्यक्ष श्री. विजयराव देशमुख यांनी माळशिरस नगरपंचायतीमध्ये सुवर्ण अक्षराने आपले नाव कोरलेले आहे. असे अनेक राजकारणी लोक आहेत ज्यांना ४० वर्ष राजकारण करूनसुद्धा सर्वोच्च पद गाठता आले नाही मात्र, ४० व्या वर्षी विजयराव देशमुख यांनी नगराध्यक्ष पदाची माळ गळ्यामध्ये घातलेली आहे. नूतन भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष विजयराव देशमुख यांना बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्या वतीने भावी कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button