वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ वृक्षारोपण करुन केले रक्षा विसर्जन
आई वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लावली रोपे
नातेपुते (बारामती झटका)
सेवानिवृत्त शिक्षक सदाशिव ज्ञानेश्वर लोंढे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या तिसऱ्या दिवशीच्या जलदान विधीवेळी शेतामध्ये वृक्षारोपण करुन त्यांचे रक्षा विसर्जन करण्यात आले. त्याबरोबर आईच्या स्मृतीप्रीत्यर्थही आंब्याचे झाड लावण्यात आले.
सध्या वृक्षारोपण ही काळाची गरज असुन पाणी दूषित होऊ नये याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. ही गरज ओळखूनच सेवानिवृत्त शिक्षक सदाशिव ज्ञानेश्वर लोंढे (वय ८३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने त्यांचा अंत्यविधीनंतर तिसऱ्या दिवशी जलदान कार्यक्रमानिमित्त त्यांची मुले आनंदकुमार लोंढे, शशिकांत लोंढे व मुलगी जयश्री सोनवणे यांनी तोंडले ता. माळशिरस येथील शेतामध्ये सदाशिव लोंढे यांचे अस्थि व रक्षा आंब्याची रोपे लावून त्याखाली विसर्जन करण्यात आले. मागील वर्षी शांताबाई सदाशिव लोंढे यांचेही निधन झाले होते. या दोघा आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुलांनी आंब्याची रोपे लावून वृक्षारोपणाचा संदेश दिला.
यावेळी रिपाई राज्य उपाध्यक्ष किरण धाईंजे, पंचायत समिती सदस्य अजय सकट, तालुकाध्यक्ष प्रा. नरेंद्र भोसले, सरपंच भिकाजी लोंढे, रिपाई युवक तालुकाध्यक्ष रविराज बनसोडे, ता. युवक अध्यक्ष दशरथ नवगिरे, ता. सरचिटणीस प्रविण साळवे, बौध्दाचार्य कांबळे, पत्रकार आनंदकुमार लोंढे, सुजित सातपुते, आप्पासाहेब सोनवणे, केदार चंदनशिवे, मारुती सोनवले, शशिकांत लोंढे, संतोष कुरणे, प्रसाद सोनवले, मच्छिंद्र लोंढे, गोरख लोंढे, अरुण लोंढे, विनोद लोंढे, सचिन लोंढे, युवराज लोंढे, हर्षल लोंढे, रूपेश लोंढे, कानिफनाथ लोंढे, शुभम लोंढे आदी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Excellent article! The depth of analysis is impressive. For those wanting more information, I recommend this link: FIND OUT MORE. Keen to see what others think!