वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची महाराष्ट्र विधानसभेसाठी 30 उमेदवारांची यादी जाहीर….

माळशिरस विधानसभा अनुसूचित जाती मतदार संघासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची घोषणा..
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 जाहीर झालेली असून केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर केलेली आहे. निवडणुकीचे पडघम सुरू होताच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभेसाठी 30 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. त्यामध्ये माळशिरस तालुका अनुसूचित जाती मतदार संघासाठी राज यशवंत कुमार यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली आहे.


वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार धुळे शहर जितेंद्र शिरसाट, सिंदखेडराजा भोजसिंग तोरडशिंग रावल, उमरेड सपना राजेंद्र मेश्राम, बल्लारपूर सतीश मुरलीधर मालेकर, चिमूर अरविंद आत्माराम सांदेकर, किनवट प्राध्यापक विजय खूपसे, नांदेड उत्तर प्रा. डॉ. गौतम दुधडे, देगलूर सुशील कुमार देगलूरकर, पाथरी विठ्ठल तळेकर, परतुर आष्टी रामप्रसाद थोरात, घनसावंगी सौ. कावेरी ताई बळीराम खटके, जालना डेव्हिड घुमरे, बदनापूर सतीश खरात, देवळाली अविनाश शिंदे, इगतपुरी भाऊसाहेब काशिनाथ इंगळे, उल्हासनगर डॉक्टर संजय गुप्ता, अनुशक्ती नगर सतीश राजगुरू, वरळी अमोल आनंद निखाळजे, पेण देवेंद्र कोळी, आंबेगाव दीपक पंचमुख, संगमनेर अजीज अब्दुल होरा, राहुरी अनिल भिकाजी जाधव, माजलगाव शेख मजूर चांद, लातूर शहर विनोद खटके, तुळजापूर डॉ. स्नेहा सोनकाटे, उस्मानाबाद एडवोकेट प्रणित शामराव डिकले, परांडा प्रवीण रणबागुल, अक्कलकोट संतोष कुमार, खंडू इंगळे, माळशिरस राज यशवंत कुमार, मिरज विज्ञान प्रकाश माने अशा 30 उमेदवारांच्या नावांच्या याद्या जाहीर केलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.