ताज्या बातम्याराजकारण

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार – मनसे माळशिरस विधानसभा अध्यक्ष कुंडलिकराजे मगर..

निमगाव (बारामती झटका)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महायुतीचे अधिकृत उमेदवार लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसैनिक तन-मन-धनाने काम करून नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माळशिरस तालुका विधानसभा अध्यक्ष व निमगाव मगराचे गावचे युवा नेते कुंडलिकराजे खंडेराव मगर यांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका स्पष्ट केली. देशाच्या चौदाव्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजप व महायुतीच्या मित्र पक्षांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज साहेब ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम मनसैनिक महायुती सोबत निवडणुकीत उतरलेले आहेत.

निमगाव मगराचे ता. माळशिरस, येथे महायुतीच्या घटक पक्षांची बैठक सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माळशिरस तालुका निवडणूक प्रमुख के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये कुंडलिकराजे मगर यांनी मत व्यक्त करीत असताना सांगितले की, माळशिरस तालुक्यातील तमाम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते एक दिलाने, एक मनाने खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार जोमाने करून विजयामध्ये सहभागी होतील.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button