वेळापुर ग्रामपंचायत समोर करणार बेमूदत धरणे आंदोलन.

वेळापूर (बारामती झटका)
वेळापुरच्या नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी सन २००५/२००६ मध्ये पाणी पुरवठा योजना अंतर्गत १४,९८,१९८ रू. (चौदा लाख आठ्यान्नव हजार एकशे आठ्यान्नव रू.) खर्च करुन पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. तसेच पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन करण्यात आली होती. परंतु, सध्या पाण्याची टाकी, पाईपलाईन व त्या ठिकाणची जागा बेपत्ता आहे. या बाबतीत ग्रामपंचायतीस विचारणा केली असता त्याचा आणि आमचा काही संबंध नाही असे उत्तर मिळत आहे आणि सक्षम प्राधिकारी भूसंपादन उपविभागीय अधिकारी अकलुज यांना विचारले असते उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
या सर्व गोष्टींचा छडा लावण्यासाठी व वेळापुर ग्रामपंचायतची गायब झालेली जागा, पाण्याची टाकी व पाईपलाईन याच्या बाबतीत ग्रामपंचायतीने काय प्रयत्न केले ते सार्वजनिक करण्यात यावेत. अन्यथा दि. २४/६/२०२४ पासुन वेळापुर ग्रामपंचायत समोर मा. युवराज मंडले व मी औदुंबर (पिनु) येडगे बेमूदत धरणे आंदोलन करत आहोत.


याबाबत आज ग्रामविकास अधिकारी वेळापूर, गटविकास अधिकारी माळशिरस, सक्षम प्राधिकारी भूसंपादन उपविभागीय अधिकारी अकलुज व सहाय्यक पोलीस निरीक्षक वेळापुर यांना निवेदन देण्यात आले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.