वेळापूर ग्रामपंचायतीचे सरपंच ते विधानभवन तालीका अध्यक्ष उत्तमराव जानकर यांचा संघर्षमय प्रवास….

संघर्षयात्री उत्तमराव शिवदास जानकर यांनी कोणतीही राजकीय परिस्थिती नसताना स्वकर्तृत्वातून यशाचे शिखर गाठले….
वेळापूर (बारामती झटका)
राजकारण, समाजकारण किंवा अन्य कोणतेही यशाचे शिखर गाठण्यासाठी कायम संघर्ष करावा लागतो. असाच संघर्षयात्री उत्तमराव शिवदास जानकर यांनी कोणतीही राजकीय शक्ती अथवा घराण्याचा राजकीय वारसा नसताना स्वकर्तृत्वातून यशाचे शिखर गाठलेले आहे. उत्तमराव जानकर पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य होऊन सरपंच ते विधानभवन तालिका अध्यक्ष पदापर्यंतचा उत्तमराव जानकर यांचा संघर्षमय प्रवास आहे…
जानकर परिवार मूळ धानोरे गावचे. व्यवसायानिमित्त वेळापूर येथे वास्तव्यास आलेले होते. वेळापूर येथे लाकुड कापण्याची मशीन, सिनेमा थिएटर, हॉटेल परमिट रूम, वाहतूक व्यवसाय अशा अनेक व्यवसायामधून वेळापूर येथे शिवदास जानकर व त्यांच्या बंधूंनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली होती. लाकडाचा मोठा व्यवसाय होता. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज येथे जानकर यांच्या लाकडी अड्ड्यातील सरपंच महाप्रसादासाठी जात असत. कधी कधी उत्तमराव जानकर गोंदवलेकर महाराजांच्या आशीर्वादासाठी लाकडाच्या गाडीसोबत जात असत. उत्तमराव जानकर यांना लहानपणापासून वेगवेगळे छंद होते. कॉलेज जीवनात खरी राजकारणाची सुरुवात झालेली होती. अनेक शालेय जीवनातील मित्र राजकीय जीवनामध्ये नाते टिकवून ठेवलेले होते.

राजकारणाची खरी सुरुवात वेळापूर ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदापासून सुरू झाली. 17 सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये दोन जागेवर निवडून आले. एका जागेचा राजीनामा दिल्यानंतर उत्तमराव गटाचे 06 व विरोधी गटाचे 10 सदस्य होते. तरीसुद्धा नाट्यमयरित्या उत्तमराव जानकर सरपंच झाले, तेव्हापासून उत्तमराव जानकर यांनी राजकारणात पाठीमागे न पाहिल्याने राजकीय चढता आलेख कायम राहिलेला आहे. चार टर्म वेळापूर ग्रामपंचायतीची सत्ता ठेवलेली आहे. दरम्यानच्या काळामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पिलीव पंचायत समिती व वेळापूर जिल्हा परिषद गटामध्ये निवडून आलेले होते. जिल्ह्याचे राजकारण करण्यापेक्षा तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होण्याकरता उत्तमराव जानकर यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा दिला आणि पंचायत समिती सदस्यांची अदलाबदल होऊन सुद्धा उपसभापती झालेले होते. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चुरशीच्या व रंगतदार निवडणुकीत ग्रामपंचायत गटामधून अनुसूचित जाती मधून पहिल्यांदा मार्केट कमिटीचे संचालक झालेले होते. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये जो गोंधळ झाला. तोच खऱ्या अर्थाने उत्तमराव जानकर यांचा राजकीय यू टर्न ठरला. उत्तमराव जानकर व धैर्यशील मोहिते पाटील यांची राजकीय मैत्री झाली. लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील व विधानसभा निवडणुकीत उत्तमराव जानकर यांना सहकार्य करण्याचे मोहिते पाटील व जानकर गटांमध्ये मनोमिलन झाले. मोहिते पाटील व उत्तमराव जानकर यांच्या राजकीय 40 वर्षाच्या मनोमिलनाची पोहोच पावती मिळाली. धैर्यशील मोहिते पाटील खासदार व उत्तमराव जानकर आमदार झाले.
उत्तमराव जानकर मुंबईच्या विधान भवनात पहिल्या अधिवेशनात आमदारकीची शपथविधी करून कामकाजामध्ये सहभागी झालेले होते. डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन नागपूर येथील अधिवेशनात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या आशीर्वादाने उत्तमराव जानकर यांना नागपूर अधिवेशनात तालिका अध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळालेली आहे.
वेळापूर ग्रामपंचायत सरपंच ते विधान भवन तालुका अध्यक्ष उत्तमराव जानकर यांचा संघर्षमय प्रवासाचे फलित झालेले आहे. उत्तमराव जानकर यांनी अनेक निवडणुका लढवल्या मात्र यश संपादन झाल्यानंतरच यशाची शिखरे चढता येतात, हे मात्र निश्चित आहे. हे ओळखूनच विधानभवनाच्या यशाच्या शिखरावर गेलेले आहेत. भविष्यात संसदेच्या शिखरावर जावावेत, अशी पाक्षिक साळुबाई वार्तापत्र व साप्ताहिक बारामती झटका परिवार यांचेकडून तालिका अध्यक्ष तथा आमदार उत्तमराव शिवदास जानकर यांना भावी कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



