वेळापूर-शेंडेचिंच-तांदुळवाडी-महिम रस्ता निकृष्ट दर्जाचा होतोय, ग्रामस्थ उपोषणाच्या तयारीत….
अकलूज (बारामती झटका)
वेळापूर-शेंडेचिंच-तांदुळवाडी-महिम प्रजिमा 212 रस्त्याचे काम सुरू आहे. सदरचा रस्ता निकृष्ट दर्जाचा होत असल्याने शेंडेचिंच येथील ग्रामस्थ आमरण उपोषणास बसणार असल्याचे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांना ग्रामस्थांच्या वतीने सोपान हनुमंत शिंदे, निखिल देविदास घाडगे, ज्ञानेश्वर विठ्ठल भोसले, प्रदीप दामोदर जाधव, पांडुरंग नामदेव कदम, मंगेश अंकुश भोसले, दीपक बाळासो घाडगे यांनी निवेदन दिलेले असून सदर निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रवींद्र चव्हाण, मुख्य अभियंता पुणे, अधीक्षक अभियंता सोलापूर यांना देण्यात आलेल्या आहेत.
शेंडेचिंच येथील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात वेळापूर-शेंडेचिंच-तांदळवाडी-महिम प्रजिमा 212 वरती आपल्या विभागामार्फत चालू असलेल्या कामावरती डांबराची जाडी 20 एम एम दिसून येत नाही व रोडवरील दगड उघडे स्पष्टपणे दिसत आहेत. कामाच्या इस्टिमेटनुसार काम होत नाही. सदर रस्त्याचा वापर शाळेतील मुले, लहान मोठी माणसे रोजच्या दळणवळणासाठी रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. झालेले निकृष्ट डांबर काम दर्जेचे व त्वरित योग्य त्या मापदंडाप्रमाणे व नियमाप्रमाणे करून मिळावे व चालू असलेले निकृष्ट दर्जाचे काम त्वरित थांबवण्यात यावे. तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व अन्य कोणी अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
सदर कामावरती कोणतीही कारवाई न झाल्यास गावातील नागरिक आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत, असे निवेदन शेंडेचिंच येथील ग्रामस्थांनी दिलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Joint Genesis Reviews, Pricing, and bonuses visit here: joint genesis