वेळापूर येथे जय मल्हार 3D होम डिझाईनिंग कार्यालयाचा थाटात व दिमाखात उद्घाटन सोहळा संपन्न…

प्रतिकूल परिस्थितीमधून चैतन्य उमेश बनकर यांनी उद्योग व्यवसायास गुढीपाडव्यानिमित्त शुभारंभ केलेला आहे…
वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर ता. माळशिरस, येथील चैतन्य उमेश बनकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन स्वतःचा जय मल्हार थ्रीडी होम डिझायनिंग कार्यालयाची गुढीपाडव्यानिमित्त सुरुवात केली आहे. या कार्यालयाचा वेळापूर येथील श्री शंभू महादेव देवालय ट्रस्टच्या शॉपिंग सेंटरमध्ये थाटात व दिमाखात उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे.
वेळापूर येथील दत्तात्रय राऊ बनकर व गजराबाई दत्तात्रय बनकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत शेती व्यवसाय करून आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले. उभय दाम्पत्य यांना उमेश, गोरख व सुनिता बालटे आटपाडी अशी तीन अपत्य आहेत. उमेश बनकर यांना वेळापूर येथील आडत परिवारातील अरुणा अर्धांगिनी आहेत, तर गोरख बनकर यांना बोरगाव येथील पांढरे परिवारातील उज्वला अर्धांगिनी आहे. उमेश व अरुणा यांना चैतन्य व ऋषिकेश अशी दोन मुले आहेत तर गोरख व उज्वला यांना आशुतोष व आदेश अशी दोन मुले आहेत. आई-वडिलांच्या संस्कारावर उमेश व गोरख या दोन राम-लक्ष्मणासारख्या जोडीने प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिलेले आहे.

चैतन्य उमेश बनकर सिव्हील इंजिनियर झाला आहे तर ऋषिकेश उमेश बनकर एमबीए झालेला आहे. अशितोष गोरख बनकर बीएससी ऍग्री झाला आहे तर आदेश गोरख बनकर मेकॅनिकल इंजिनिअर झालेला आहे. दोघा भावांनी आपली दोन्ही मुले उच्च शिक्षण देऊन बनकर परिवाराने समाजासमोर चांगला आदर्श निर्माण केलेला आहे. उमेश व गोरख जशी राम लक्ष्मणासारखी जोडी आहे तशीच त्यांना मिळालेल्या अर्धांगिनी उज्वला व अरुणा यांनी सुद्धा घरामध्ये एकोपा ठेऊन समाजामध्ये चांगला आदर्श दाखवून दिलेला आहे.
चैतन्य उमेश बनकर याचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकर वस्ती, वेळापूर येथे झाले आहे. पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण शंकरराव मोहिते पाटील विद्यालय, वेळापूर येथे झाले आहे. अकरावी ते बारावी कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी यशवंतनगर येथे पूर्ण केलेले आहे तर डिप्लोमा श्रीराम शिक्षण संस्था, पानीव येथे पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वतःचा वेळापूर येथे जय मल्हार थ्रीडी होम डिझायनिंग हा व्यवसाय सुरू केला आहे. सदरच्या ऑफिसमधून 2D प्लॅनिंग, आरसीसी, डिझाईन, साईट सुपरव्हिजन, 3D एलिवेशन, इंटेरियर डिझाईन, अशा प्रकारे सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध राहणार आहे. चैतन्य उमेश बनकर 77 09 17 10 26 संपर्क नंबर आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.