जल जीवन मिशनच्या कामांचा आता दर महिन्याला आढावा – मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम

झालेल्या कामांची देणे देण्यासाठी शासनाकडे जवळपास ७० कोटींचा प्रस्ताव, आत्तापर्यंत ठेकेदारांना ४० लाख दंड
सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत जवळपास १ हजार ३२९ कामे मंजूर होती, त्यापैकी जवळपास ३२० कामे पूर्ण झालेली आहेत. तर अनेक कामे प्रगतिपथावर आहेत. या उर्वरित कामांना गती यावी, तसेच वेळेत ही कामे पूर्ण व्हावीत यासाठी दर महिन्याला या कामांचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली आहे.
सध्या जल जिवन मिशनच्या कामामध्ये प्रगती आवश्यक आहे. अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना यावर अवलंबून आहेत, त्यामुळे या कामांचा सातत्याने आढावा अपेक्षित आहे. सोलापूर जिल्ह्यात मंजूर असलेली अनेक कामे प्रगतिपथावर आहेत. तर यापैकी जवळपास ३२० कामे पूर्ण झालेली आहेत. काही ठेकेदारांनी कामात दिरंगाई केलेली आहे. त्या ठेकेदारांना आतापर्यंत ४० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती यावेळी जंगम यांनी दिली. तर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील जवळपास १७४ ठिकाणी या कामांना काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्या अडचणी सोडविण्यासाठी आता तालुकास्तरावर तसेच काही ठिकाणी प्रत्यक्ष कामावर जाऊन पाहणी केली जाणार असल्याची माहितीही जंगम यांनी दिली आहे. कामे पूर्ण झालेल्या ठेकेदारांची बिले अदा करण्यासाठी शासनाकडे सातत्याने मागणी केली जाते. गेल्या १० ते १२ दिवसापूर्वीच जवळपास ७० कोटी रुपयांची मागणी शासनाला कळविली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



