वेळापूर येथील अनिल जाधव यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…

सुप्रसिद्ध हॉटेल अनिल हॉटेलचे मालक अनिल जाधव यांचे दुर्दैवी दुःखद निधन झालेले आहे..
वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर, ता. माळशिरस येथील अनिल जाधव यांचे वयाच्या 45 व्या वर्षी गुरुवार दि. 02/10/2025 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भाऊजय असा परिवार आहे. वेळापूर येथील सुप्रसिद्ध हॉटेल अनिल हॉटेलचे मालक यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यांच्यावर वेळापूर येथील स्मशानभूमीमध्ये रात्री अंतिम संस्कार करण्यात आलेले आहेत. त्यांचा रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम शनिवार दि. 04/10/2025 रोजी सकाळी 7.00 वाजता होणार आहे.
वेळापूर पंचक्रोशीमध्ये अनिल हॉटेल माध्यमातून ग्राहकांच्या मनपसंत भोजनासाठी अनिल जाधव यांचे हॉटेल सुप्रसिद्ध होते. त्यांचा सुसंस्कृत स्वभाव असून परिस्थितीची जाणीव असल्याने सर्वांशी मिळून मिसळून वागणूक होती. हॉटेलचा व्यवसाय करून सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने समाजामध्ये किंमत होती. चारच दिवसापूर्वी त्यांना निमोनिया झालेला होता. उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.

अनिल जाधव यांच्या मृत्यूने जाधव परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. जाधव परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व अनिल यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



