वेळापूर येथील शेरी नं. १ शाळेतील विद्यार्थ्याची अशीही संवेदनशीलता…!

चि. मेघराज कमलाकर माने देशमुख याने स्वत:च्या वाढदिवसानिमित्त शाळेला भेट दिली पितळी घंटा…!
वेळापूर (बारामती झटका)
वाढदिवस हा मुलांच्या आनंदाचा व आवडीचा दिवस. या दिवशी मुले आई वडीलांकडे नवीन कपडे व भेटवस्तूंचा आग्रह धरतात. पण जिल्हा परिषद प्राथमिक शेरी नं. १ शाळेतील विद्यार्थी चि. मेघराज कमलाकर माने देशमुख या विद्यार्थ्याने मात्र याला छेद देत संवेदनशीलतेचा प्रत्यय दिला आहे.
शाळेतील जुनी घंटा तुटल्याचे त्याला माहित होते. त्याने पालकांकडे शाळेसाठी नवीन पितळी घंटेचा आग्रह धरला. मेघराजचे पालक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. कमलाकर माने देशमुख यांनी त्वरीत शाळेला दोन हजार रुपये किंमतीची पितळी घंटा भेट दिली. मेघराजच्या या संवेदनशीलतेबद्दल शाळेचे मुख्याध्यापक डाॅ. प्रेमनाथ रामदासी, उपशिक्षक श्री. पांडुरंग वाघ, श्री. प्रदीप कोरेकर व श्रीमती रेश्मा खान यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

चि. मेघराजच्या या आदर्श कृतीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.



नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Very engaging and funny! For more information, click here: LEARN MORE. Let’s chat!