वेळापूर येथील श्रीमती ताराबाई दिगंबर माने देशमुख यांचे वार्धक्याने दुःखद निधन…

सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सतीशराव माने देशमुख यांना मातृशोक.
वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर ता. माळशिरस, येथील श्रीमती ताराबाई दिगंबर माने देशमुख यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वार्धक्याने शनिवार दि. ०५/१०/२०२४ रोजी सकाळी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सतीशराव माने देशमुख यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्यावर आजच वेळापूर येथील स्मशानभूमीत सकाळी ११ वा. अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
माने देशमुख यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व श्रीमती ताराबाई माने देशमुख यांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.