ताज्या बातम्यासामाजिक

वेळापुरातील महापुरुषांच्या पुतळ्यांचे काम तात्काळ सुरु करावे, अन्यथा ग्रामस्थ आंदोलन करणार..!

वेळापुर ग्रामस्थ व बहुजन समाज बांधवांच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी

वेळापूर (तालुका माळशिरस)

वेळापूर ता. माळशिरस या गावातून संत ज्ञानेश्वर महाराज राष्ट्रीय महामार्ग आळंदी-पंढरपूर-मोहोळ या महामार्गाचे व उड्डाणपुलाचे काम चालू आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर,साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे या राष्ट्रीय महापुरुषांचे पुतळे महामार्गामध्ये बाधित ठरत असल्याने राष्ट्रीय महामार्ग व संबंधित अधिकारी तत्कालीन प्रांताधिकारी अकलुज विभाग, डिवायएसपी अकलुज विभाग, माळशिरस तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, वेळापुर एपीआय, तलाठी, ग्रामविकास अधिकारी व वेळापूर गावातील प्रतिष्ठित सन्माननीय आजी-माजी पदाधिकारी त्यांच्या समवेत शांतता कमिटीची बैठक होऊन सदरील महापुरुषांचे पुतळे तात्पुरत्या स्वरूपात बाजूला घेण्यासंदर्भात व संबंधित विभागाने १) छत्रपती शिवाजी महाराज २) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ३) साहित्यरत्न लो. अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या पुतळ्याचे भव्य दिव्य स्वरूपात स्मारकाचे बांधकाम करून देण्याचे अभिवचन, अश्वासन दिल्यामुळे सदरील पुतळ्यापैकी छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे तात्पुरत्या स्वरूपात बाजूला बसविण्यात आले. व लो. आण्णा भाऊ साठे यांचा पुतळा आहे तेथेच आहे.

परंतु, मागील दोन वर्षापासून सततचा पाठपुरावा करून ही संबंधीत विभागाने पुतळ्याच्या सुशोभीकरण, स्मारकांच्या कामासाठी कसलीही दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रामस्थामध्ये प्रचंड नाराजी असून आम्ही सततच्या केलेल्या पाठपुराला प्रतिसाद ही दिला नाही. प्रयत्न केले नाहीत. अद्याप स्मारकांचा प्रश्न जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर प्रलंबित ठेवला जात आहे, असा ग्रामस्थांचा समज निर्माण झाल्याने संतप्त ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचे ठरले आहे.

तरी आपण योग्य तो मार्ग काढावा अशी आम्हाला अपेक्षा आहे. तसेच बाधित पुतळे तात्पुरत्या स्वरूपात बाजूला घेताना सर्व समाज बांधवांनी संबंधित राष्ट्रीय महामार्ग व अधिकारी यांना शांततेने संयमाने सहकार्याची भूमिका ठेवून तिन्ही पुतळे तात्पुरत्या स्वरूपात बाजूला बसविले आहेत. तरी प्रांत अधिकारी विभागाकडून व संबंधित विभागाकडून स्मारकांबाबत दुर्लक्ष केल्यामुळे सर्व बहुजन समाज बांधवांच्या भावना तीव्र झाल्या आहेत.

दरम्यान, आपणाला निर्वाणीचा इशारा म्हणून वेळापूर परिसरातील सर्व बहुजन समाज बांधव, ग्रामस्थ यांच्या वतीने शनिवार दि.२२ जून २०२४ रोजी पालखी चौक याठिकाणी संबंधित मगरुर विभागाच्या निषेधार्थ तीव्र स्वरूपात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

दरम्यान, आंदोलनाच्या वेळी संबंधित विभागाच्यावतीने महापुरुषांच्या स्मारकाबाबत ठोस असे लेखी आश्वासन पत्र आंदोलन स्थळी दिल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत आंदोलन माघारी घेतले जाणार नाही, याची नोंद घ्यावी. आंदोलन प्रसंगी होणाऱ्या परिणामास संबंधित विभाग व तत्सम अधिकारी यांचीच जबाबदारी राहील, याची नोंद घ्यावी. आपण कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी असल्याने बहुजन समाज बांधवांच्या भावनेचा आदर करून महापुरुषांच्या स्मारकांचा व पुतळ्यांचा प्रश्न गांभीर्याने सोडवाल हीच अपेक्षा.

आपल्या माहितीस्तव पत्र व्यवहारातील काही प्रति सोबत जोडत आहे. सदरील निवेदन निवासी नायब तहसीलदार सौ. देसाई यांनी स्वीकारले.
यावेळी बाळासाहेब धाईंजे, मिलिंद सरतापे, रजनीश बनसोडे, संदिप कदम, ओंकार माने देशमुख, विजय बनसोडे, संदीप माने देशमुख, संजय पनासे, विनायकराव माने, अजय बनसोडे, महेश माने देशमुख, प्रदीप सरवदे, उमेश वाघमारे, जवान माने देशमुख, अजित साठे, महेश साठे, अशोक वायदंडे, श्रुंगराज माने देशमुख, महेंद्र साठे, राहुल साठे, आलताफ कोरबू, राहुल गायकवाड इत्यादी उपस्थित होते.

राष्ट्रीय महापुरुषांच्या पुतळ्यांच्या स्मारकाचे काम करुन देण्यासाठी संबंधित विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शनिवारी ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करणार आहोत.‌ – मिलिंद सरतापे

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button