विधान परिषद आमदार चित्राताई वाघ यांनी भाजपच्या माळशिरस तालुका अध्यक्षा निताताई मगर यांना शाब्बासकी देऊन कौतुक केले.

माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता पार्टी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा तथा विधान परिषदेच्या आमदार चित्राताई वाघ यांनी भारतीय जनता पार्टी महिला आघाडी माळशिरस तालुका अध्यक्षा नीताताई मगर यांचे अभिनंदन केलेले असल्याने माळशिरस तालुक्यातील महिला भगिनींमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे.
विधान परिषदेच्या आमदार चित्राताई वाघ यांनी माळशिरस तालुका अध्यक्षा नीताताई मगर यांना पाठविलेल्या पत्रामध्ये, भाजपची लाडकी बहीण प्रिय निता मगर शाब्बास… तू भाजप सदस्यता अभियानात सहभागी झालीस आणि या अभियानाच्या माध्यमातून तू एक हजाराहून अधिक सदस्य जोडले हे खरंच कौतुकास्पद आहे, त्याबद्दल सर्वप्रथम तुझे अभिनंदन करते.
संपूर्ण देशात विशेषतः आपल्या महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यापासून भाजप सदस्यता अभियान जोरदार सुरू आहे. भारतीय जनता पक्षाच्या परिवारात जास्तीत जास्त लोकांनी सामील व्हायचे आहे मात्र, कित्येक जणांना आपण या परिवारात कसे सामील होऊ शकतो हेच माहीत नसतं. अशा लोकांसाठी हे अभियान एक महत्त्वाचं माध्यम ठरतं आणि त्यातलाच तू दुवा झालीस त्याबद्दल मला तुझा अभिमान वाटतो.
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण सर्वांनीच अंत्योदयाचा निश्चय केला आहे. अगदी तळागाळापर्यंत विकास पोहोचला पाहिजे आणि सरकारी योजनांचा लाभ देखील प्रत्येकांपर्यंत पोहोचायला हवा हेच आपल्या सगळ्यांचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपल्या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तर आहेतच त्यासोबत आपले मुख्यमंत्री तथा लाडके देवाभाऊ, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांचे मार्गदर्शन पदोपदी मिळते आणि यापुढे देखील मिळत राहील. त्यामुळे यापुढे भाजप परिवाराचा विचार करण्यासाठी अशीच योगदान देत रहा, तुझीच आमदार चित्रा किशोर वाघ असे पत्र पाठविलेले आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते येथील मधुर मिलन मंगल कार्यालय येथे सदस्यता अभियान नोंदणीला सुरुवात करण्यात आलेली होती. माळशिरस तालुक्यात ७१ हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट आरोग्यदूत राम सातपुते यांनी जाहीर केलेले होते. उद्दिष्ट पूर्तीकडे सदस्य नोंदणी गेलेली आहे. अनेक कार्यकर्त्यांनी सदस्य नोंदणीचे एक हजाराचे उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे. तालुका अध्यक्षा नीता मगर यांनी सुद्धा १००० सदस्य नोंदणी केलेली असल्याने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुभेच्छापर पत्र पाठवलेले होते. आत्ता विधान परिषदेच्या आमदार चित्राताई वाघ यांनी शाब्बासकी देऊन केलेल्या कार्याचे कौतुक केलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.